फोटो - ट्विटरवर आमिर खानच्या सिनेमाच्या पोस्टवर करण्यात आलेले ट्विट...
मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या आगामी 'पीके' या सिनेमाचे पोस्टर नुकतेच रिव्हील करण्यात आले आहे. हे पोस्टर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरले आहे. पीकेच्या फस्ट लूकमध्ये आमिर निर्वस्त्र झालेला दिसतोय. दरम्यान त्याच्या हातात एक रेडिओ दिसतोय. ट्विटरवर काहीजण त्याची खिल्ली उडवत आहेत, तर काही जण याला सिनेमाचे हे एक नवे युग म्हणून संबोधत आहेत.
फस्टपोस्ट या न्यूज वेबसाइटने पाच प्रश्नांच्या माध्यमातून आमिरची थट्टा उडवली आहे.
वेबसाइटचे पाच प्रश्न पुढीलप्रमाणे...
1.. आता वीट आपल्या हेअर रिमूव्हर प्रॉडक्टच्या जाहिरातींमध्ये
कतरिना कैफच्या ऐवजी आमिर खानच्या नावाचा विचार करेल का?
2.. राजकुमार हिराणी दिग्दर्शित हा सिनेमा हिंदू देवतांवर व्यंग आहे. सोबतच दीनानाथ बत्रा मलेरियासह आता बॉलिवूड आणि आमिर खानला भारतातील मोठ्या विकारांच्या यादीत सामील करण्याची मागणी करणार का?
3.. आता आमिर खान
रणबीर कपूरला 'बट बॅटल'मध्ये मात देणार का?
4.. आता ट्रांजिस्टरला नवीन ग्राहर मिळाले आहेत का? ज्याप्रकारे ट्रांजिस्टरने एन्ट्री घेतली आहे, त्यावरुन त्याला नवे आयुष्य मिळाले आहे का?
5.. 'पीके'च्या रिलीजनंतर आमिर खान स्वतःला कव्हर करण्याचे वचन देईल का?
सिनेमात अनुष्कासुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत...
'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'थ्री इडियट्स' यांसारखे सुपरहिट सिनेमे देणारे राजकुमार हिरानी या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. आपल्या संपूर्ण फिल्मी करिअरमध्ये आमिर पहिल्यांदाच निर्वस्त्र झाला आहे. या सिनेमात आमिरसह अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपूत मेन लीडमध्ये आहेत.