आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leander Paes Puja Gupta At Sports Illustrated Swimsuit Issue Launch

पूजा गुप्ता-लिएंडर पेसने केले मासिकाचे लाँचिंग, मॉडेल्सने दाखवल्या ग्लॅमरस अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्ये 14 एप्रिलला 'स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड स्विमसुट इश्यू' या मासिकाचे शानदार पध्दतीने लाँचिंग करण्यात आले. या लाँचमध्ये 'फालतू', 'शॉर्टकट रोमिओ' आणि 'गो गोवा गॉन'सारख्या सिनेमात दमदार अभिनय करणारी अभिनेत्री पूजा गुप्तासुध्दा पोहोचली होती. पूजा व्यतिरिक्त या लाँचिंग कार्यक्रमात टेनिस खेळाडू लिएंडर पेससुध्दा उपस्थित होता.
मासिकाच्या लाँचमध्ये पूजा गुप्ता आणि लिएंडर पेससह अनेक मॉडेल्स स्विमसुटमध्ये दिसल्या. या मॉडेल्सने रॅम्पवर वॉक करून लाँचमधील उपस्थितांना आपल्याकडे आकर्षित केले.
पूजा गुप्ताने यावेळी राखडी रंगाचा गाऊन परिधान केला असल्याने ती ग्लॅमरस डॉलप्रमाणे दिसत होती. तसेच, काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळी जीन्स परिधान केलेला लिएंडरसु्ध्दा कूल अंदाजात दिसला.
लाँचिंगमध्ये पूजा गुप्ता आणि लिएंडर पेसव्यतिरिक्त सुलेमान, सुधांशु पांडे, करण ओबेरॉय, निखिल व्दिवेदीसह आणखी काही सेलेब्सनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा सुपर ग्लॅमरस इलस्ट्रेटेड स्विमसुट इश्यू लाँचची काही खास छायाचित्रे...