आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lekar Hum Deewana Dil Movie Press Meet Hyderabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Pics:कधी घाबरली तर कधी हसली, इव्हेंटमध्ये अभिनेत्रीच्या दिसल्या वेगवेगळ्या अदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री दीक्षा सेठ
मुंबईः 'लेकर हम दीवाना दिल' या सिनेमासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता अरमान जैन सिनेमाच्या प्रमोशनसाठी हैदराबादला पोहोचला. येथे त्याने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये भाग घेतला. यादरम्यान त्याच्या सिनेमातील अभिनेत्री दीक्षा सेठदेखील उपस्थित होती. ही प्रेस कॉन्फरन्स द पार्क हॉटेलमध्ये आयोजित केली होती.

प्रेस कॉन्फरन्सदरम्यान हे सेलेब्स कूल अंदाज दिसत होते. दीक्षा ब्लॅक पेपलम टॉप आणि व्हाइट लॉन्ग स्कर्टमध्ये दिसली. तिच्या स्कर्टवर सारसचा फोटो होता. तिने उजव्या हातात ब्लॅक स्टोनची रिंग घातली होती. दूसरीकडे अरमान चेक्सचा शर्ट आणि ट्राउझर पँटमध्ये दिसला. त्याने यावेळी लुंगीलादेखील प्रमोट केले. अरमान बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीरसोबतच करिश्मा-करीनाचा आत्तेभाऊ आहे.

प्रेस कॉन्फरन्सच्या दरम्यान दीक्षाच्या अनेक अदा दिसल्या. चर्चेदरम्यान ती कधी हसायची तर एखादा प्रश्न विचारल्यावर मध्येच विचारात पडायची. अनेकदा तिच्या चेहर्‍यावर घाबरल्याचे भाव दिसले. दीक्षाची हा बॉलिवूडमधला पहिला सिनेमा आहे. तिने बर्‍याच तेलगु आणि तमिल सिनेमांमध्ये काम केले आहे. 'लेकर हम दीवाना दिल'चे दिग्दर्शन आरिफ अलीने केले आहे. हा सिनेमा 4 जुलै, 2014 ला प्रदर्शित होणार आहे.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा प्रेस कॉन्फरन्सच्यावेळी अरमान-दीक्षाचे वेगवेगळे फोटो...