डावीकडून रणधीर कपूर, एक्ट्रेस दीक्षा सेठ, रेखा, अरमान जैन, रीमा जैन, नीतू कपूर आणि ऋषि कपूर
मुंबई - करीना, करिश्मा आणि
रणबीर कपूरचा आते भाऊ अरमान जैनचा ]लेकर हम दीवाना दिल] हा सिनेमा आज (4 जुलै) सर्वत्र रिलीज झाला. रिलीजपूर्वी मुंबईत या सिनेमाचा शानदार प्रीमिअर सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूडमधथील अनेक सुपरस्टार्स, दिग्दर्शक आणि निर्माते सहभागी झाले होते.
शाहरुख खान आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत या स्क्रिनिंगला पोहोचला. यावेळी त्याची पत्नी गौरी खानसुद्धा त्याच्यासोबत हजर होती. प्रीमिअरवेळी अरमानने शाहरुखच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. प्रीमिअरमध्ये अभिषेक बच्चन आई जया बच्चनसह आला होता. यावेळी त्याची थोरली बहीण श्वेता नंदाचीही या प्रीमिअर सोहळ्याला हजेरी होती. याशिवाय कपूर घराण्यातून रणबीर, ऋषि, रणधीर, नीतू, राजीव कपूर प्रीमिअरमध्ये पोहोचले होते. तसेच ग्लॅमरस गर्ल्स
परिणीती चोप्रा, ईशा गुप्ता, नर्गिस फाखरी, इलियाना डीक्रूजसह अनेक अभिनेत्रींची मांदियाळी यावेळी जमली होती.
करण जोहर, ए. आर. रहमान, रेखा, तब्बू, मोहित मारवाह, सुनील शेट्टी, अमृता अरोरा, गोल्डी बहल, सोनाली बेंद्रे, अयान मुखर्जी, तुषार कपूर, अनु मलिक, प्रेम चोप्रा, डेविड धवन, सोहेल खान, जावेद अख्तर, राकेश रोशन या सेलिब्रिटींनीही अरमानला त्याच्या पहिल्यावहिल्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या.
'लेकर हम दीवाना दिल' हा सिनेमा आरिफ अली यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात मेन लीडमध्ये झळकणारे अरमान आणि दीक्षा यांचा हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. यापूर्वी दीक्षा अनेक तेलगू आणि तामिळ सिनेमांमध्ये झळकली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'लेकर हम दीवाना दिल'च्या प्रीमिअरला जमलेली सेलेब्सची मांदियाळी...