आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कामसूत्र 3D'चे पाच FACTS, शर्लिनची बोल्ड भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कामसूत्र या विषयावर यापूर्वी ब-याच सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र केवळ भारतातच नव्हे तर परदेशातसुद्धा ज्या सिनेमांची विशेष चर्चा झाली ते सिनेमे म्हणजे मीरा नायर यांचा 'कामसूत्र: ए टेल ऑफ लव' आणि रूपेश पॉल यांचा 'कामसूत्र 3D' हे आहेत.
'कामसूत्र 3D' हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. हा सिनेमा बोल्ड विषय आणि शर्लिन चोप्राच्या न्यूड सीन्समुळे चर्चेत आहे. शर्लिन चोप्रा हे भारतीय सिनेरसिकांच्या परिचयाचे नाव आहे. तर परदेशात कान फेस्टिव्हलमधेये या सिनेमाची त्याच्या कामूक विषयामुळे चर्चा झाली
होती.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'कामसूत्र 3D'शी संबंधित असे पाच फॅक्ट्स सागंत आहोत, ज्याविषयी तुम्हाला ठाऊक नाहीये...
पहिला - शर्लिनने साकारली कामदेवीची भूमिका
'कामसूत्र 3D' या सिनेमात शर्लिन चोप्रा कामदेवीच्या भूमिकेत असून तिने बरेच उत्तेजक सीन्स सिनेमात दिले आहेत. त्यामुळे रिलीजपूर्वीच सिनेमाची चर्चा होतेय. शर्लिन या सिनेमात मेन लीडमध्ये आहे. शर्लिन ट्विटरवरसुद्धा लोकप्रिय आहे. अलीकडेच शर्लिन या सिनेमाच्या दिग्दर्शकासह झालेल्या वादामुळे चर्चेत होती. मात्रया दोघांमधील वाद संपुष्टात आला आहे.
दुसरा - अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्स असलेला पहिला भारतीय सिनेमा असल्याचा
निर्मात्यांचा दावा
अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर करण्यात आलेला हा पहिला भारतीय सिनेमा असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. निर्मात्यांनी अलीकडेच सिनेमाचा दुसरा ट्रेलर लाँच केला होता. सिनेमाचा जास्तीत जास्त भाग हा समुद्र आणि पाण्यात शूट करण्यात आला आहे. 'कामसूत्र 3D'च्या शुटिंगसाठी खास जहाजांची खरेदी निर्मात्यांनी केली होती. या जहाजांवर फाईट सीन्स चित्रीत करण्यात आले आहेत.
तिसरा - 'कामसूत्र 3D'ने रिलीजपूर्वीच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोडली छाप
'कामसूत्र 3D' या सिनेमा रिलीजपूर्वीच आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये छाप सोडली आहे. कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचे विशेष कौतुक झाले आहे. 66व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी शर्लिन चोप्रा दिग्दर्शक रुपेश पॉलसह उपस्थित होती.
चौथा- 'कामसूत्र 3D'ने प्री-सेलचे रेकॉर्ड मोडले
'कामसूत्र 3D'ने कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्री-सेलचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले. या सिनेमाला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. याशिवाय 86 व्या आयफा अवॉर्ड सोहळ्यात सिनेमाला नामांकन मिळाले आहे. बेस्ट मोशन पिक्चर्स, ऑरिजिनल स्कोअर आणि ओरिजिनल साँग या तीन विभागात सिनेमाला नामांकन मिळाले होते.
पाचवा - सिनेमासाठी खास कॉश्च्युम तयार करण्यात आले
'कामसूत्र 3D' या सिनेमातील सर्व पात्रांसाठी खास कॉश्च्युम तयार करण्यात आले. प्रसिद्ध डिझायनर नीता लुल्ला यांनी या सिनेमासाठी कॉश्च्युम डिझाइन केले. तर सरोज खान या सिनेमाच्या कोरिओग्राफर आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'कामसूत्र 3D'ची निवडक छायाचित्रे...