आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: 'रंग रसिया'मध्ये दिसेल नंदनाचा बोल्ड लूक, वडिलांना मिळाला आहे नोबेल पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वडील अमर्त्य सेन यांच्यासोबत नंदना सेन)
मुंबई- अभिनेत्री नंदना सेन आणि रणदीप हुड्डा स्टारर 'रंग रसिया' हा सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल झाला आहे. हा सिनेमा कथा आणि बोल्ड सीन्समुळे बराच चर्चेत आहे. प्रसिद्ध केतन मेहता यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. 2008 मध्ये या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. मात्र पडद्यावर यायला या सिनेमाला सहा ते सात वर्षांचा काळ लागला.
या सिनेमाद्वारे नंदना सेन ब-याच वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. हा सिनेमा प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या आयुष्यावर बेतला आहे. या सिनेमात नंदनाने भरपूर अंगप्रदर्शन केले आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला पडेल आणि अंगप्रदर्शन करण्यात काहीच अडचण नसल्याचे नंदना सेन हिने एका मुलाखतीत सांगितले होते.
नंदना सेन नोबेल पुरस्कार विजेते प्रसिद्ध अर्थशास्त्र तज्ज्ञ अमर्त्य सेन यांची कन्या आहे. नंदनाची आई नबानिता देव सेन लेखिका असून त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 2013मध्ये नंदना पेंगुइन पब्लिकेशनचे सीईओ जॉन मेकिंसन यांच्यासोबत लग्नगाठीत अडकली.
1997 मध्ये 'द डॉल' या सिनेमाद्वारे फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या नंदनाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूड सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 'रंग रसिया'पूर्वी ती 'टँगो चार्ली', 'ब्लॅक', 'फॉरएवर', 'सेड्यूसिंग मार्या', 'द मिथ', 'द वॉर विदिन', 'मॅरीगोल्ड' आणि 'प्रिन्स' या सिनेमांत झळकली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नंदना सेन हिची निवडक छायाचित्रे... या छायाचित्रांमध्ये नंदनाचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतोय.