आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lesser Known Member Of Kapoor Family Rajiv Kapoor

B'day: बॉलिवूडमध्ये यशस्वी होऊ शकला नाही कपूर घराण्यातील हा सदस्य, जाणून घ्या त्याच्याविषयी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- राजीव कपूर आणि रणबीर कपूर)
बॉलिवूडचे मोठे घराणे म्हणून ओळखल्या जाणा-या कपूर घराण्यातील राज कपूर यांचे पुत्र राजीव कपूर यांचा आज वाढदिवस आहे. राजीव कपूर राज कपूर यांचे सर्वात लहान पुत्र असून ते रणधीर आणि ऋषी कपूर यांचे भाऊ आहेत. 25 ऑगस्ट 1962 मध्ये जन्मलेले राजीव यांनी आज आपल्या वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. बॉलिवूडमधील यशस्वी फॅमिलीतून असूनदेखील राजीव सिनेमांमध्ये यश मिळवू शकले नाहीत.
राजीव यांनी जवळपास दहा हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला. यापैकी मोजके सिनेमे बॉक्स ऑफिसवर चालले. त्यांच्या 1985 मध्ये रिलीज झालेला राम तेरी गंगा मैली हा सिनेमा बराच गाजला होता. मात्र पुढे त्यांच्या अभिनय करिअरची गाडी रुळावरुन घसरली. अभिनयात अपयश हाती आल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातकडे वळवला.
निर्माता म्हणून...
हिना- 1991- एग्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर
प्रेमग्रंथ- 1996- एग्झिक्यूटिव्ह प्रोड्यूसर
आ अब लौट चलें- 1999- प्रोड्यूसर

दिग्दर्शक म्हणून...
प्रेम रोग- 1982- असिस्टंट/यूनिट डायरेक्टर
बीवी ओ बीवी- 1981- असिस्टं ट/यूनिट डायरेक्टर
प्रेमग्रंथ- 1996- डायरेक्टर

एडीटर म्हणून...
प्रेमग्रंथ- 1996
आ अब लौट चलें- 1999
1999 पासून राजीव सिनेसृष्टीपासून दूर आहेत. 2001मध्ये वयाच्या 39च्या वर्षी त्यांनी आर्किटेक्ट आरती सभरवालसह लग्न केले होते, मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा राजीव कपूरची कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे...