आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Liar\'s Dice\' Is India\'s Official Entry To The Oscars

ऑस्करमध्ये हा सिनेमा करेल भारताचे प्रतिनिधित्व, जाणून घ्या याविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('लायर्स डाइस'च्या एका सीनमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी)
मुंबई: 'लायर्स डाइस' या हिंदी सिनेमाला भारताकडून सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमाच्या श्रेणीमध्ये ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार असे निश्चित झाले आहे. सिनेमा एका आदिवासी तरुणीवर आधारित आहे. तिचा पती दिल्ली गेल्यानंतर पुन्हा घरी येत नाही. अशी या सिनेमाची कथा आहे.
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव सुपर्णा सेन यांनी सांगितले, की 'लायर्स डाइस' सिनेमाने ऑस्कर पुरस्कार 2015मध्ये 29 सिनेमांना मागे टाकत भारताची आधिकृतरित्या नोंद मिळवली आहे. हा सिनेमा मल्याळम अभिनेत्री गीतू मोहनदासने दिग्दर्शित केले आहे.
सेन यांनी सांगितले, की फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया (एफएफआय)ला यावेळी 30 अर्ज प्राप्त झाले. एफएफआयच्या 12 मुख्य सदस्यांनी या सिनेमाची निवड केली आहे. एफएफआय प्रत्येक वर्षी भारतातून ऑस्करसाठी भारतीय सिनेमांची नोंद करत असतात. 'लायर्स डाइस'ची कहानी भारत-तिब्बत सीमेच्या लगतच्या एका गावाभोवती गुंफण्यात आली आहे. सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि गीतांजली थापा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमातून घेण्यात आलेली काही निवडक छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाइडवर ट्रेलर...