आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका गाण्यासाठी मिळाले होते 70 लाख रुपये, पाहा हनी सिंगचे खासगी आयुष्यातील खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सिंगर हनी सिंगच्या लग्नाचे छायाचित्र)
मुंबई - यो यो हनी सिंग बॉलिवूडमधील असे एक नाव आहे, ज्याची गाणी यशाची हमखास गँरंटी असतात. जवळपास प्रत्येक सिनेमात त्याचे एखादे गाणे तरी नक्की असते. सध्याच्या काळात तो सर्वाधिक मानधन घेणारा गायक ठरला आहे.
अलीकडेच त्याचे 'माझी सटकली रे... 'हे 'सिंघम रिटर्न्स'मधील गाणे रिलीज झाले आहे. हे एक प्रमोशनल साँग आहे. यापूर्वी हनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्येही झळकला आहे. तो एक पंजाबी रॅप गायक, संगीतकार, गायक आणि अभिनेता आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात रेकॉर्डिंग आर्टिस्टच्या रुपात केली होती. संगीतातील प्रतिष्ठित ग्रॅमी अवॉर्ड जिंकण्याची त्याची महत्त्वकांक्षा आहे.
रेकॉर्डिंग आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात...
हनीने आपल्या करिअरची सुरुवात रेकॉर्डिंग आर्टिस्टच्या रुपात केली होती. 'शकल पे मत जा' (2011) या सिनेमासाठी हनीने पहिल्यांदा संगीतकार म्हणून काम केले होते. त्यानंतर कॉकटेल या सिनेमातील 'मैं शराबी' या गाण्याद्वारे त्याने पहिल्यांदा हिंदी सिनेमात गायनाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

सर्वात जास्त मानधन घेणारा गायक...
हनी सिंग बॉलिवूडमधील सर्वात जास्त मानधन घेणारा गायक ठरला आहे. 2012मध्ये त्याने 'कॉकटेल' आणि 'मस्तान' या सिनेमासाठी सर्वाधिक म्हणजे तब्बल 70 लाख रुपये मानधन घेतले होते.
शिक्षणात मन रमत नव्हते...
15 मार्च 1984 रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे शिख कुटुंबात हनी सिंगचा जन्म झाला. त्याचे खरे नाव हृदेश सिंग असे आहे. बालपणापासूनच त्याला संगीताची आवड होती. मात्र त्याने शिक्षणात लक्ष द्यावे, असे त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे होते. युकेतील ट्रीनिटी स्कूलमधून त्याने संगीताचे शिक्षण घेतले आहे. करिअरच्या सुरुवातीच्या काळात हनीने पंजाबी सिनेमांसाठी संगीतकार आणि गायक म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्याने आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला. आत्तापर्यंत त्याने अनेक बॉलिवूड स्टार्ससह काम केले आहे.
लग्नावर राहिला सस्पेन्स...
लग्नावरुन हनी सिंग वादात अडकला. 2011मध्ये त्याने लग्न केल्याची बातमी होती. त्याच्या लग्नाची छायाचित्रेसुद्धा इंटरनेटवर आली होती. मात्र या छायाचित्रांवर त्याने बराच काळ मौन बाळगले. मात्र नंतर आपले लग्न झाले नसल्याचे त्याने म्हटले. ही छायाचित्रे एका
फोटोशूटदरम्यान असल्याची त्याने म्हटले होते.
कालांतराने मात्र हनीने लग्न झाल्याचे कबूल केले. मात्र तेव्हासुद्धा त्याने आपल्या पत्नीच्या नावाचा खुलासा केला नाही. 2014 मध्ये एका मुलाखतीत त्याने सांगितले होते, की त्याच्या पत्नीला त्याचे कोणतेच गाणे पसंत पडत नाही.
या बॉलिवूड सिनेमांसाठी केले पार्श्वगायन...
कॉकटेल- 2012- गाणे- मैं शराबी
सन ऑफ सरदार- 2012- गाणे- रानी तू मैं राजा
खिलाडी 786- 2012- गाणे- लोनली-लोनली
रेस-2- 2012- गाणे- पार्टी ऑन माय माइंड
बजाते रहो- 2013- गाणे- कुडी तू बटर
चेन्नई एक्सप्रेस- 2013- गाणे- लुंगी डांस
बॉस- 2013- गाणे- बॉस टायटल सॉन्ग, पार्टी ऑल नाइट
यारियां- 2013- गाणे- ABCD, सनी-सनी
डेढ़ इश्किया- 2014- गाणे- हॉर्न ओके प्लीज
रागिनी एमएमएस-2- 2014- गाणे- चार बोटल वोदका
भूतनाथ रिटर्न्स- 2014- गाणे- पार्टी विद भूतनाथ
फुगली- 2014- गाणे- ये फुगली फुगली क्या है
किक- 2014- गाणे- जो मुझे यार ना मिले


चार सिनेमांमध्ये केला अभिनय...
मिर्जा (2012, पंजाबी), तू मेरा 22 मैं तेरा 22 (2013, पंजाबी), बॉस (2013, हिंदी), द एक्सपोज (2014, हिंदी)
हनी सिंगच्या आयुष्याशी निगडीत फॅक्ट्स...
- हनी सिंगचे सुरुवातीचे शिक्षण दिल्ली स्थित पंजाबी बाग येथील गुरु नानक पब्लिक स्कूलमध्ये झाले.
- शालेय दिवसांत तो अभिनेता अमोल पालेकर यांच्या मिमिक्रीसाठी ओळखला जात होता.
- संगीताचे सुरुवातीचे शिक्षण त्याने डीजे विशालकडून घेतले.
- हनी सिंग कॉमर्स स्टुडंट आहे. त्याने 2000 मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.
- दिल्लीत झालेल्या वॉर ऑफ DJ या स्पर्धेत त्याने दुसरे स्थान पटकावले होते. तेव्हापासून त्याच्या सिंगिंग करिअरला सुरुवात झाली.
- करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याने केवळ पंजाबी गाणे गायचा निर्णय घेतला होता.
- हनी सिंगच्या आईवडीलांनी अलीकडेच दिल्लीत एक नवीन बंगला खरेदी केला आहे.
- वेगाने बाईक चालवणे हनीला पसंत आहे.
वादासोबत जवळचे नाते..
हनी सिंगच्या नावाभोवती नेहमीच वादाची झालर बघायला मिळते. 2013 या वर्षभरात तो अनेकदा वादात अडकला. 'मैं हूं बलात्कारी' हे गाणे गायल्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. त्याच्याविरोधात लखनऊमध्ये खटला दाखल करण्यात आला होता. मात्र लवकरच तो या वादातून बाहेर पडला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हनी सिंगची बालपणीची, लग्नाची आणि मित्रांसोबतची खास छायाचित्रे...