आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांवर तयार होणार बायोपिक...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामाजिक प्रश्नांवर आणि जनलोकपाल विधेयकाच्या मुद्दयावर आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रातील समाजसेवक अण्णा हजारे यांची राष्ट्रीय पातळीवरही विशेष ओळख तयार झाली आहे. याच कारणामुळे त्यांचे जीवन रुपेरी पडद्यावर आणण्याची अनेक निर्माते-दिग्दर्शकांची इच्छा आहे. असेच एक बॅनर 'राइज पिक्चर्स' 'अण्णा किशन बाबूराव हजारे' नावाचा सिनेमा बनवत आहेत.
त्यांच्यासोबत लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर आणि निर्माते अनिरुद्ध गायकर हेदेखील काम करणार आहेत. शशांक दीड वर्षांपासून या बायोपिकवर संशोधन करत आहेत. सिनेमातील कलावंतांची निवड अद्याप करण्यात आली नाही. मात्र, या सिनेमाचे शुटिंग मुंबई, दिल्ली, काश्मीर, लडाख आणि राजस्थानमध्ये होणार असल्याचे निश्चित आहे.