आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनमधील वँड्सवर्थच्या साऊथ साइड शॉपिंग सेंटरच्या या लिफ्टमध्ये पाय ठेवताच लोकांची किंचाळी निघते. लिफ्टच्या तळाला थ्रीडी छायाचित्र अशा प्रकारे लावण्यात आले आहे की लिफ्टला तळ नसल्याचा भास होतो. आपण आता खाली पडणार या भीतीने लोक मोठमोठय़ाने ओरडायला सुरुवात करतात. अशा प्रकारच्या लिफ्ट अँल्टन टॉवर, नेमेसिस आणि ओब्लिविऑनमध्ये आहेत.
लोकांना चकित करण्यासाठी कलावंत अँण्ड्रय़ू वॉकर याने लिफ्टमध्ये हे थ्रीडी छायाचित्र लावले आहे. नेमेसिसमध्ये पुढच्या महिन्यात अशाच प्रकारची एक गुहा तयार करण्यात येत आहे. त्या गुहेमध्ये भीतीदायक राक्षसांची छायाचित्रे लावण्यात येतील. नेमेसिसची प्रवक्ता कॅथरिन डकवर्थ म्हणते, आमच्या या प्रकल्पामुळे किती लोक घाबरतात आणि किती लोक आकर्षित होतात हे पाहायचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.