आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Little AbRam Catches Dad Shahrukh Khan's FAN Shoot

शाहरुखच्या शूटिंगमध्ये दिसला मुलगा अबराम, पाहा त्याचे आतापर्यंतचे सर्व PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('फॅन'च्या शूटिंगवेळी अबराम)
मुंबई- शाहरुख खान 'फॅन' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मंगळवारी (9 डिसेंबर) त्यांने मुंबईमध्ये आपला बंगला 'मन्नत'च्या बाहेर सिनेमाचे शूटिंग केले. यावेळी धाकटा मुलगा अबरामचीसुध्दा झलक पाहायला मिळाली.
अबराम एका महिलेच्या कुशीत होता आणि त्याच्या चेह-यावर हास्य दिसले. त्याने ब्लॅक लाइनिंगचा पांढरा शर्ट घातलेला होता आणि हाताची बोटे चोखत होता. 'फॅन'चा जो सीन चित्रित करण्यात येत होता त्यामध्ये शाहरुख मन्नतमध्ये घुसणा-याचा प्रयत्न करतो मात्र त्याला मध्ये जाण्यास सिक्युरिटी गार्ड रोखतो. सिनेमात शाहरुखची दुहेरी भूमिका आहे.
सिनेमाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहे. तसेच आदित्य चोप्रा सिनेमाची निर्मिती करत आहे. यशराज फिल्म्स बॅनर अंतर्गत तयार होणारा हा सिनेमा 14 ऑगस्ट 2015 रोजी रिलीज होत आहे.
ईदवेळी दिसली होती अबरामची पहिली झलक-
अबराम जन्म 27 मे 2013 रोजी झाला. परंतु त्याची पहिली झलक यावर्षी ईदवेळी (6 ऑक्टोबर) दिसली होती. शाहरुखने आपल्या टि्वटर अकाऊंटवर रात्री 10:31 वाजता फोटो शेअर केला होता. त्यानंतर 'हॅपी न्यू इअर'मध्येसुध्दा अबरामची खास झलक पाहायला मिळली होती. या सिनेमात तो पापा शाहरुखसोबत खेळताना दिसला होता. त्यानंतर त्याचा एक नवीन फोटो सोशल मीडियावर आला होता. त्या फोटोमध्ये अबराम सांताक्लॉजच्या गेटअपमध्ये दिसत होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अबरामची आतापर्यंत दिसलेल्या झलकची छायाचित्रे...