आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पावलांना मिळणार थिरकण्याची संधी, महाराष्ट्रातून होणार 'डान्सिंग सुपरस्टार'ची निवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्नेहसंमेलनांमध्ये थिरकरणा-या छोट्या पावलांना आता हक्काचे व्यासपीठ मिळणार असून स्टार प्रवाह वाहिनीतर्फे 6 ते 14 वर्षे वयोगटांतील मुलांसाठी ‘महाराष्ट्राचे डान्सिंग सुपरस्टार - छोटे मास्टर्स’ हा नवा रिअ‍ॅलिटी शो लवकरच सुरु होणार आहे. सध्या या शोसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात ऑडीशन्स सुरु असून औरंगाबाद आणि नाशिक येथे 25 ऑगस्ट रोजी ऑडिशन्स घेतल्या जाणार आहेत. कोल्हापूर आणि पुणे येथून लिटील मास्टर्सचे ऑडीशन पूर्ण झाले आहे.
लहान मुलांमधील नृत्यकौशल्ये हेरून त्यांना ग्लॅमर प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्राचे डान्सिंग सुपरस्टार - छोटे मास्टर्स’ या रिअ‍ॅलिटी शोची कल्पना साकार करण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांपैकी सर्वोत्कृष्ट नर्तकाला ‘महाराष्ट्र डान्सिंग सुपरस्टार’ या किताबाने गौरवण्यात येणार आहे. या व्यासपीठावर लहान नर्तकांना भारतीय व जागतिक नृत्यशैलींपैकी आपल्या आवडीचे नृत्य सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

कोरिओग्राफर सॅव्हिओ बार्नेस, विश्वास नाटेकर आणि प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर या शोचे परीक्षक असणार आहेत. ही स्पर्धा सोलो, जोडी आणि ग्रुप सादरीकरणांसाठी खुली असल्याची माहिती चॅनलतर्फे देण्यात आली.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या या शोचे परिक्षक विश्वास नाटेकर, सॅव्हिओ बार्नेस यांच्याविषयी...