मुंबई - असं म्हणतात की, जोड्या स्वर्गात बनतात... ही गोष्ट बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींवरसुद्धा फिट बसते. खरं तर बॉलिवूडमधून पॅचअपपेक्षा ब्रेकअपच्या बातम्या कानांवर पडत असतात. मात्र इंडस्ट्रीत काही जोड्या अशा आहेत, ज्या लग्नगाठीत अडकल्यापासून सोबत आहेत. अनेकदा या जोड्यांच्याही ब्रेकअपच्या बातम्या मीडियात आल्या, मात्र या जोड्यांनी आपल्या नात्याला कधीही तडा जाऊ दिला नाही.
या जोड्यांमध्ये
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. याशिवाय शाहरुख-गौरी, मलायका-अरबाज खान यांसारख्या सेलिब्रिटींच्या नावाचाही समावेश आहे.
प्रेरणादायी आहे शाहरुख आणि गौरीची लव्ह स्टोरी...
बॉलिवूडची सर्वात आकर्षक जोडी म्हणून शाहरुख खान आणि गौरी खान यांना ओळखले जाते. या दोघांची प्रेमकहाणी प्रत्येक जोडप्यासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. या दाम्पत्याने खूप कष्टातून यशोशिखर गाठले आहे. शाहरुख आणि गौरीचे लग्न 1991 मध्ये झाले होते. गौरीने आपल्या कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध जाऊन शाहरुखसह लग्न केले आणि यशस्वी संसार करुन दाखवला. या दाम्पत्याच्या लग्नाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, अमिताभ-जया, धर्मेंद्र-हेमामालिनीपासून ते अजय-काजोलपर्यंत का खास आहे या सेलिब्रिटींचे लग्न...