आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी 48 तर कुणी 23 वर्षांपासून हे स्टार्स नांदताहेत गुण्यागोविंदाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जावेद अख्तर आणि शबाना आझमीने 9 डिसेंबर 2014 आपल्या लग्नाचा 30वा वाढदिवस साजरा केला. 64 वर्षांच्या अभिनेत्री शबाना आझमी जावेद यांच्या दुसरी पत्नी आहेत. यानिमित्त शबाना आझमी यांनी टि्वटरवर लिहिले, आमची आजसुध्दा मैत्रीसारखे नाते आहे. लग्नाने आमच्या मैत्रीला जराही वेगळे नाव आले नाही.
बी-टाऊनमध्ये नात्यांचा कालावधी काही महिने अथवा वर्षांचा असतो. तसेच काही जोड्या अशाही आहेत ज्या आपले नाते गेल्या काही वर्षांपासून जपत आहेत. नेहमीच आपले नाते उत्कृष्ट असल्याचे त्यांनी जगासमोर दाखवले आहे. या जोड्यांमध्ये बॉलिवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन-जया, जावेद-शबाना, दिलीप कुमार-सायरा बानो यांची नाव सामील आहेत. तसेच, सध्याच्या पिढीचे शाहरुख-गौरी, मलायका-अरबाज खान यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
शाहरुख आणि गौरीची
लग्न- 1991, 23वर्षे
बॉलिवूडची सर्वात आकर्षक जोडी म्हणून शाहरुख खान आणि गौरी खान यांना ओळखले जाते. या दोघांची प्रेमकहाणी प्रत्येक जोडप्यासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. या दाम्पत्याने खूप कष्टातून यशोशिखर गाठले आहे. शाहरुख आणि गौरीचे लग्न 1991 मध्ये झाले होते. गौरीने आपल्या कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध जाऊन शाहरुखसह लग्न केले आणि यशस्वी संसार करुन दाखवला. या दाम्पत्याच्या लग्नाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा, अमिताभ-जया, धर्मेंद्र-हेमामालिनीपासून ते अजय-काजोलपर्यंत का खास आहे या सेलिब्रिटींचे लग्न...