आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या Hairstyleशी मिळती-जुळती आहे आमिरची न्यू हेअरस्टाइल, पाहा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच काहीतरी नवीन करत असतो. यावेळी त्याने हेअरस्टाइलने आपल्या चाहत्यांना सरप्राइज केले आहे. तो मंगळवारी (29 सप्टेंबर) रात्री पृथ्वी थिएटरच्या बाहेर नवीन हेअरस्टाइलमध्ये दिसला.
आमिर जेव्हा थिएटरमधून बाहेर पडला, तेव्हा चाहत्यांनी त्याला घेरले. यादरम्यान त्याच्यासह काही थिएटर आर्टिस्टसुध्दा होते. आमिरने ब्लू जीन्स आणि टी-शर्ट घातलेला होता. हातात मोबाईल आणि स्पाइक पकडलेले होते. आमिरच्या चेह-यावर हलकी दाढीसुध्दा दिसली. त्याची हेअरस्टाइल नेहमीपेक्षा खूप वेगळी दिसून आली. मात्र, त्याची ही हेअरस्टाइल सलमान खानशी मिळती-जुळती आहे. आमिर विधू विनोद चोप्रा यांच्या कार्यालयाबाहेर आमिर दिसला होता तेव्हा त्याचा हा लूक पहिल्यांदा समोर आला होता.
आमिरचा 'पीके' हा आगामी सिनेमा आहे. राजकुमार हिराणीने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सिनेमात अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत, बोमण ईराणी, संजय दत्तसुध्दा दिसणार आहे. सिनेमा यावर्षीच्या 19 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिरच्या नवीन हेअरस्टाइलची छायाचित्रे...