आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Affairs Between Bollywood Actresses And Cricketers

केवळ अनुष्काच नव्हे, बी टाऊनच्या या अभिनेत्रीसुद्धा झाल्या क्रिकेटर्सवर फिदा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्स यांच्या प्रेमसंबंधांचे किस्से खूप जुने आहेत. एकीकडे क्रिकेटर्सना या अभिनेत्रींच्या सौंदर्याची भूरळ पडली तर दुसरीकडे या अभिनेत्रीदेखील त्यांच्या मोठ्या चाहत्या आहेत. क्रिकेट आणि बॉलिवूडचा संबंध नेहमीच राहिला आहे. काही अभिनेत्री आणि खेळाडूच्या प्रेमाने लग्नाचे स्टेशन गाठले तर काहींचे नाते अफवांपर्यंतच मर्यादित राहिले.
सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा उपकर्णधार विराट कोहली यांच्या अफेअरची बरीच चर्चा आहे. अलीकडेच ढाका मध्‍ये झालेल्‍या टी-20 विश्‍व चषकामध्‍ये श्रीलंकेसोबत झालेल्‍या अंतीम सामन्‍यात पराभूत झाल्‍यानंतर विराट मंगळवारी अनुष्‍का शर्माला भेटायला जोधपूरमध्ये गेला होता. नंतर दोघेही खेजडला किल्‍लावर फिरायला गेले. रात्री उशिरापर्यंत दोघेही सोबत फिरताना दिसले. याआधीही काही महिन्‍यांपूर्वी भारतीय संघ न्‍यूझीलंड दौ-यावर असताना अनुष्‍का न्‍यूझीलंडला गेली होती. दोघांचेही सोबत- सोबत फिरतानाचे फोटो प्रसिध्‍द झाले होते. भारतीय संघ ढाका येथे रवाना होण्‍यापूर्वी अनुष्‍काला भेटायला विराट श्रीलंकेला गेला होता. त्यामुळे आता अनुष्का-विराटचे प्रेमाचे रुपांतर लग्नात होणार का? याचीच उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.
आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगतोय ज्यांनी क्रिकेटर्सबरोबर डेट केले, काहींनी त्यांच्याबरोबर लग्न केले तर एक अभिनेत्री लग्न न करताच आई झाली.
कोण आहेत या अभिनेत्री हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...