आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रवैल तब्बल 32 वर्षांनंतर बनवणार ‘लव्ह स्टोरी’चा सिक्वल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बेताब’, ‘और प्यार हो गया’ आणि ‘अंजाम’सारख्या सिनेमांचे दिग्दर्शक राहुल रवैल यांनी 1981 मध्ये कुमार गौरवसोबत ‘लव्ह स्टोरी’ सिनेमा बनवला होता. मात्र, त्यांना त्याचे श्रेय देण्यात आले नव्हते.
80 आणि 90च्या दशकांमध्ये कोणत्याही नव्या कलावंताला लाँच करण्यासाठी राहुल रवैल अगदी योग्य दिग्दर्शक असल्याचे मानले जात होते. त्यांच्या ‘लव्ह स्टोरी’ सिनेमातून कुमार गौरव- विजेता पंडित, ‘बेताब’ मधून सनी देओल- अमृता सिंह, ‘बेखुदी’ मधून काजोल-कमल सदाना आणि ‘और प्यार हो गया’ मधून ऐश्वर्या रायने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. जॉन अब्राहमसाठी रवैलनी ‘इस प्यार को मैं क्या नाम दूं’ सिनेमाची निर्मिती केली होती. मात्र, सहनिर्माता प्रीतीश नंदीशी मतभेद झाल्याने सिनेमा प्रदर्शित झाला नाही. या वेळी निर्माता शशी रंजनने आपली मुलगी अनुष्काच्या सिनेमातील पर्दापणाची जबाबदारी रवैल यांच्याकडेच दिली आहे. ‘लव्ह स्टोरी रिटर्न्‍स’ हे सिनेमाचे शीर्षक असणार आहे.
शूटिंग जूनच्या शेवटच्या आठवड्यात इटलीमध्ये सुरू होणार आहे. 1981 मध्ये राजेंद्र कुमारने आपला मुलगा कुमार गौरवसाठी ‘लव्ह स्टोरी’ रवैल यांच्या दिग्दर्शनामध्ये बनवला होता. एडिटिंगच्या शेवटच्या टप्प्यात रवैल आणि राजेंद्र कुमारमध्ये मतभेद झाल्याने रवैल सिनेमातून बाहेर पडले. आता 32 वर्षांनंतर रवैल ‘लव्ह स्टोरी’ची पुढची आवृत्ती ‘लव्ह स्टोरी रिटर्न्‍स’ बनवत आहेत. ते 80 च्या दशकातील सिनेमांप्रमाणे हा सिनेमा बनवत आहेत. याचे बहुतांश शूटिंग काश्मीरऐवजी इटलीमध्ये होणार आहे.