आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे झाली होती अनितासह पहिली भेट, वाचा राजेश खन्ना यांची शेवटची Love Story

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो: राजेश खन्ना आणि अनिता अडवाणी
मुंबई: बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या मालमत्तेचा जेव्हा कधी उल्लेख होतो, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांसह आणखी एका महिलेचे नाव समोर येते. ती महिला म्हणजे, अनिता अडवाणी. अनिता यांच्याविषयी सर्वांना ठाऊक आहे, की त्या काकांचे शेवटचे प्रेम होत्या.
अनिता यांच्या सांगण्याप्रमाणे, त्या काकासह 10 वर्षे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या आहेत. 33 वर्षांच्या असल्यापासून त्या काकांना ओळखत होत्या. या पॅकेजमधून जाणून घेऊया काका आणि
अनिता यांच्या लव्ह-स्टोरीविषयी बरेच काही...
महबूब स्टुडिओमध्ये झाली होती पहिली भेट:
बातम्यांनुसार, अनिता अडवाणी आणि राजेश खन्ना यांचे नाते खरंच खूप जूने होते. त्यांची पहिली भेट मुंबई वांद्रा येथील महबूब स्टुडिओमध्ये झाली होती. यादरम्यान अनिता केवळ 14 वर्षांच्या होत्या. 'बिग बॉस' या टीव्ही शोदरम्यान अनिता अडवाणी यांनी खुलासा केला होता, की त्या 14 वर्षांच्या असताना काकांनी त्यांचे लैंगिक शोषण केले होते. तेव्हा त्या मानसिक आणि शारीरिक रुपाने या गोष्टींसाठी तयार नव्हत्या.
नोट: गेल्या काही दिवसांपासून अनिता अडवाणी काका यांच्या वांद्रा परिसरातील आशीर्वाद या बंगल्याच्या विक्रीने चर्चेत आहेत. नुकतेच, बॉम्बे हायकोर्टाने राजेश खन्ना संपत्ती प्रकरणी अनिता अडवाणींची याचिका कोर्टाने फेटाळली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या काका आणि अनिता यांच्या लव्ह-स्टोरीविषयी...