आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lovebirds Ranveer Deepika, Virat Anushka Walked Hand In Hand

PHOTOS: हातात हात घालून फिरताना दिसले दीपिका-रणवीर आणि विराट-अनुष्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : सिडनीत विराट-अनुष्का आणि दीपिका-रणवीर मालदीवमध्ये एकत्र)
मुंबईः संजय लीला भन्साळी यांच्या 'गोलियों की रासलीलाः रामलीला' या सिनेमातील राम आणि लीला अर्थातच रणवीर आणि दीपिका आणि क्रिकेटर विराट आणि त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा अलीकडेच हातात हात घालून एकत्र फिरताना दिसले. एकीकडे रणवीर-दीपिका मालदीवमध्ये एकत्र दिसले, तर दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली गर्लफ्रेंड अनुष्कासोबत सिडनीस्थित डार्लिंग हार्बर बीचवर फिरताना दिसले.
'...रामलीला'च्या यशानंतर रणवीर आणि दीपिकाचे यांचे नाते अधिकच घट्ट झाले. तर अनुष्कासुद्धा 'पीके'ला मिळालेल्या यशाचा आनंद आपल्या बॉयफ्रेंडसोबत साजरा करतेय.
विराट आणि अनुष्का यावर्षी लग्नगाठीत अडकणार असल्याची बातमी अलीकडेच मीडियात आली होती. आता हे लव्हबर्ड्स खरंच आपल्या प्रेमाच्या नात्याचे रुपांतर लग्नात करणार का? याकडे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दीपिका-रणवीर आणि विराट-अनुष्काची एकत्र फिरतानाची खास छायाचित्रे...
(रणवीर-दीपिका फोटोः साभार अहमद सनी फोटोग्राफी)