आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीपिकाच्या Sizzling Lookने घातली भूरळ, 23 लाख लोकांनी पाहिला हा Video

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('लव्हली' गाण्यावर थिरकताना दीपिका पदुकोण)
मुंबई: 'हॅप्पी न्यू इअर'चे नवीन गाणे रिलीज झाले आहे. 'मै लव्हली हो गई यार नाम तेरा पढके' असे या गाण्याते बोल आहेत. या गाण्यात दीपिकाने शानदार डान्स केला आहे. या गाण्याचे संगीत आणि दीपिकाचा डान्स काही जून्या सिनेमांचे कॉकलेट असल्याचे दिसून येत आहे.
कसे आहे नवीन गाणे?
'मै लव्हली हो गई यार...' गाण्याच्या सुरुवातीला 'मोहिनी मोहिनी'पासून होते. 'तेजाब' सिनेमाच्या गाण्यासारखीच याची सुरुवात आहे. या सिनेमात माधुरी दीक्षितने डान्स केला होता. शिवाय, डान्सचे काही स्टेप्स कतरिना कैफच्या 'चिकनी चमेली' आणि 'मंगल मंगल' गाण्यातील स्टेप्सशी मिळत्या-जुळत्या आहेत. या सर्वांसोबतच, गाण्याचे बीट्स सनी लिओनच्या 'बेबी डॉल'सारखे आहेत. हे गाणे कनिका कपूरने गायले असून तिनेच 'बेबी डॉल' गायले होते.
'हॅप्पी न्यू इअर'चे दिग्दर्शन फराह खानने केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान, अभिषेक बच्चन, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, बोमन इराणी, सोनू सुद, विवान शाहने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा सिनेमा 24 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे.
आतापर्यंत 23 लाख लोकांनी पाहिला व्हिडिओ
दीपिकाचा हॉट अवतार लोकांच्या पसंतीस पडलेला दिसतोय. कारण रिलीज झाल्यापासून आतापर्यंत 23 लाख लोकांनी या गाण्याचा व्हिडिओ पाहिला आहे. या गाण्यात दीपिका बिनधास्त डान्स करताना दिसत आहे. यापूर्वी ती कधीच अशा लूकमध्ये दिसली नव्हती. दीपिका 'लव्हली...' गाण्यात स्मोकी लूकमध्ये खूपच आकर्षक दिसून येत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हॅप्पी न्यू इअर'च्या 'लव्हली...' गाण्याची छायाचित्रे आणि व्हिडिओ...