आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • LoveY Dovey Moments Of Aishwarya Rai And Abhishek Bachchan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले अभिषेक-ऐश्वर्या, पाहा lovey-dovey Moments

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रो कबड्डी लीगच्या अंतिम सामन्यादरम्यान क्लिक झालेली ऐश्वर्या आणि अभिषेकची छायाचित्रे)
मुंबई - असे म्हटले जाते, की लग्नानंतर पती-पत्नीमधील प्रेम अधिकच वृद्धिंगत होत जातं. ही गोष्ट बी टाऊनच्या या क्युट कपलवर अगदी तंतोतंत जुळते. आम्ही बोलतोय ते अभिषेक आणि ऐश्वर्याविषयी. अलीकडेच या दोघांनी प्रो कबड्डी लीगच्या अंतिम सामन्याला हजेरी लावली होती. यावेळी अभिषेक ऐश्वर्याचे केस सावरताना आणि तिला अलिंगन देताना दिसला.
प्रो कबड्डी लीगच्या अंतिम सामन्यात अभिषेकच्या जयपूर पिंक पँथर्स या टीमने यू मुंबईला पछाडत विजेतेपद मिळवले. पिंक पँथर्स विजयी होताच अभिषेकने ऐश्वर्याला अलिंगन देऊन आपला आनंद साजरा केला.
2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्या लग्नगाठीत अडकले होते. या दोघांना एक मुलगी असून तिचे नाव आराध्या आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच या दोघांचे हलकेफुलके क्षण कॅमे-यात कैद झालेले नाहीत, यापूर्वी अनेकदा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसले आहेत.
divyamarathi.comने ऐश्वर्या आणि अभिषेकच्या अशाच काही खास क्षणांच्या छायाचित्रांचे कलेक्शन केले आहे. ही छायाचित्रे तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये पाहू शकता.