(बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण)
मुंबईः बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री ठरलेली दीपिका पदुकोण हिने अलीकडेच करिअरची सात वर्षे पूर्ण केली आहेत. चढ-उतार हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक भाग असतात. आयुष्यातील संघर्षाच्या काळात संयमी राहणे हीच तुमची गुरुकिल्ली असते, असे दीपिकाने म्हटले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना ती म्हणाली, ''एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला चढ-उतार अशा दोन्ही गोष्टींना सामोरे जावे लागते. आज माझे करियर खूप चांगले सुरु आहे. मात्र सुरुवातीच्या काळात मलासुद्धा कठीण काळाला सामोरे जावे लागले आहे. जेव्हा माझे सिनेमे चालत नव्हते त्यावेळेस मी कठीण वेळेला सामोरे गेली आहे. मात्र, याच काळात मी खूप काही शिकले आहे.''
अपयशाला तू कशी सामोरे जातेस असे विचारले असता ती म्हणाली, ''तुम्ही काहीही करा पण संयम ठेवा, गोष्टी
आपोआप घडत जातात हे मी शिकले आहे.''
दीपिकाने फराह खान दिग्दर्शित 'ओम शांती ओम' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यावर्षी रिलीज झालेल्या 'हॅप्पी न्यू ईयर' या सिनेमानेदेखील तिकीट बारीवर बक्कळ कमाई केली आहे. आता ती
रणबीर कपूर स्टारर 'तमाशा'मध्ये झळकणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'ओम शांति ओम' ते 'हॅपी न्यू ईयर'पर्यंतचे दीपिकाचे चर्चित सिनेमे...