आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'लुकाछुपी' एका न ठरणा-या लग्नाची गोष्ट लवकरच रंगभूमीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लुकाछुपी नाटकाचे पोस्टर)
सध्या सोशल मीडियामुळे जग खूप जवळ आले असले तरी माणसा-माणसातले अंतर मात्र वाढले आहे. समोरची व्यक्ति कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे किंवा एकुणच व्यक्तिमत्त्व कसे आहे, हे काही सोशल मीडियावरच्या संपर्कातून समजत नाही, तर त्यासाठी एकमेकांसमक्ष असणेच गरजेचे आहे. नेमका याचाच आज अभाव आहे.
मुला-मुलींची लग्न पटकन न जमणे किंवा झालेले लग्न मोडण्याचे प्रमाण वाढण्यात पर्यवसन होते. याच वास्तवाचे भान आजच्या पिढीला रंजक पद्धतीने करुन देणारे 'लुकाछुपी' हे वैभव चिंचाळकर लिखित-दिग्दर्शित नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येण्यास सज्ज झाले आहे. टीव्ही मालिका क्षेत्रात आघाडीचा दिग्दर्शक आणि 'दुनियादारी' या चित्रपटाचा संवादलेखक म्हणून पुरस्कारप्राप्त वैभवचे हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. तर या निर्मात्यांच्या भूमिकेत विद्याधर पाठारे आणि मनीष दळवी हे आहेत.
नाटकाचा विषय जरी सामाजिक असला तरी त्याची मांडणी हलक्याफुलक्या प्रसंगनिष्ठ विनोद आणि प्रेमकथेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. अभिजित केळकर, पूर्वा गोखले, सुपर्णा श्याम हे नव्या पिढीतले कलावंत आणि ज्येष्ठ अभिनेत्री उज्ज्वला जोग असा दमदार नट संच या नाटकाला लाभला आहे.
या नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे असून प्रकाश योजन राजन ताम्हणे यांची तर वेशभूषा हर्षदा खानविलकर यांची आहे. समीर सामंत यांच्या गीतांना मिलिंद जोशी यांनी संगीतबद्ध केले आहे. लग्न ठरताना अनुभवाला येणारा नशिबाचा लंपडाव असलेली ही लुकाछुपी येत्या 29 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीसाठी रंगभूमीवर येत आहे.