(फाइल फोटो: संजय दत्त आणि मान्यता)
मुंबईः 29 जुलै रोजी संजय दत्तच्या वाढदिवशी त्याची पत्नी मान्यता त्याला भेटायला जाऊ शकली नव्हती. मात्र आता बातमी आहे, की आज करवा चौथच्या निमित्ताने संजयला भेटायला मान्यता येरवडा तुरुंगात जाणार आहे.
संजय सध्या पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. गेल्या महिन्यात संजयचा वाढदिवस होता. मात्र यादिवशी मान्यता आणि संजयची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर संजयने मान्यताला तुरुंगातून पत्र लिहून घरी नवरात्रौत्सव साजरा करण्यासाठी सागितले होते. संजयच्या म्हणण्यावरुन मान्यताने
आपल्या घरी माता की चौकीचे आयोजन केले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करवा चौथच्या निमित्ताने मान्यताने संजयसाठी उपवास ठेवला असून त्याला भेटण्यासाठी ती पुण्याला जाणार आहे.