(अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त हिनेदेखील 11 ऑक्टोबर रोजी करवा चौथचे व्रत ठेवले होते. यादिवशी ती
आपल्या पतीला भेटायला येरवडा तुरुंगात पोहोचली होती. संजय दत्त सध्या पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात तो ही शिक्षा भोगतोय.
संजयला भेटायला तुरुंगात जात असताना मान्यता ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली. तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती. गळ्यात मंगळसूत्र दिसले. खरं तर संजयच्या वाढदिवशी मान्यता त्याला भेटायला तुरुंगात जाणार होती, मात्र करवा चौथच्या दिवशी तिने त्याची भेट घेण्याचा निर्णय घेतला.
मान्यता संजयची तिसरी पत्नी असून 2008 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. या दाम्पत्याला जुळी मुले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा संजयला भेटायला निघतानाची मान्यताची छायाचित्रे...