आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madan Gadkari, Lila Mehta Get Life Achivement Award

मदन गडकरी, लीला मेहता यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अखिल भारतीय राज्य नाट्य परिषदेच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी यंदा नागपूर येथील ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी आणि ज्येष्ठ अभिनेत्री लीला मेहता यांची निवड करण्यात आली आहे. 14 जून रोजी मुंबईत पुरस्काराचे वितरण होणार आहे. पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून इतर पुरस्कारार्थींना पाच हजार रुपये आणि मानपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.


या वेळी अभिराम भडकमकर, संतोष पवार, भाऊ कदम, नंदू माधव यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात उमेश कामत, रत्नाकर मतकरी, आदिती सारंगधर, स्वरांगी मराठे, राजन ताम्हाणे, गिरीष जोशी, अनंत पणशीकर, तेजस्विनी पंडित यांना नाट्यपरिषदेने घोषित केलेल्या पारितोषिकांचे वितरणही
होणार आहे.