आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhubala\'s Glamarous Photoshoot For Life Magazine

Flashback: पाहा क्लासिक ब्युटी मधुबालाच्या मन मोहून घेणा-या दिलखेचक अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दिवंगत अभिनेत्री मधुबाला हिने 1951 मध्ये केलेल्या फोटोशूटची छायाचित्रे)
सध्याच्या काळात अभिनेत्रींचे हॉट फोटोशूट बघणे तसे चाहत्यांसाठी नित्यनेमाचेच झाले आहे. मात्र गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला हिनेसुद्धा आपल्या काळात एक ग्लॅमरस फोटोशूट केल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? जवळजवळ 50 ते 60च्या दशकात सौंदर्यसम्राज्ञी मधुबाला हिने एक ग्लॅमरस फोटोशूट केले होते. क्लासिक ब्युटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या मधुबालाने त्याकाळी लाइफ मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले होते. यासाठी एकाहून एक सुंदर पोज तिने दिल्या होत्या.
लाइफ मॅगझिनचे प्रसिद्ध फोटोग्राफर जेम्स बर्क यांनी 1951 मधुबालाचे सौंदर्य आपल्या कॅमे-यात कैद केले होते. 60 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरीदेखील या छायाचित्रांमध्ये कैद झालेले मधुबालाचे सौंदर्य कुणाचेही मन मोहून घेणारे आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला मधुबालाच्या ग्लॅमरस फोटोशूटची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा मन मोहून घेणारी मधुबालाची छायाचित्रे...
(फोटो सौजन्यः लाइफ मॅगझिन आणि ओल्ड इंडियन फोटोज संकेतस्थळ)