मुंबई: 'फॅशन' सिनेमानंतर मधुर भंडारकर आता 'कॅलेंडर गर्ल' सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. हा सिनेमा रिलीजपूर्वीच चर्चेचा विषय बनला आहे. या सिनेमाची नायिका कोण असणार यावर मधुर यांच्याकडून सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे.
परंतु सिनेमाची नायिका कोण असणार याचा उलगडा झाला आहे. बातमी अशी आहे, की दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करणारी आकांक्षा पूरी 'कॅलेंडर गर्ल्स'ची नायिका म्हणून काम करणार असल्याचे सूत्रांकडून कळाले आहे.
मधुर भंडारकर हे सिनेमाच्या नायिकेविषयी विचारलेल्या प्रश्नांवर मौन बाळगत आहेत. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मधुर कोणत्याच व्यक्तीला मोबाईल किंवा संपर्क साधता येतील अशा वस्तू आणण्याची परवानगी देत नव्हते.
'कॅलेंडर गर्ल्स' संबंधित एका सूत्राने सांगितले, की दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलेली आकांक्षा पूरी 'कॅलेंडर गर्ल्स'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
कॅलेंडरवर फोटो छापून आल्यानंतर मॉडेल कशा लोकप्रिय होतात या संकल्पनेवर आधारित हा सिनेमा आहे. मात्र यावर मधूर भंडारकर यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आकांक्षाच्या दिलखेचक अदा...