आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhur Bhandarkar\'s Film Calendar Girls First Look Out

रिलीज झाला मधुर भंडारकर यांच्या \'कॅलेंडर गर्ल्स\'चा फर्स्ट लूक, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मधुर भंडारकर यांचा 'कॅलेंडर गर्ल्स' या आगामीचा फर्स्ट लूक)
मुंबई: सामान्य जीवनाशी निगडीत विषयांवर सिनेमे तयार करून लोकांच्या मनात स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक मधुर भंडारकर यांचा 'कॅलेंडर गर्ल्स' या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक लाँच झाला आहे. मधुर या सिनेमाविषयी अनेक गोपिनियतात बाळगत असल्याचे दिसून येत आहे.
40 दिवसांच्या टाइट शेड्यूलदरम्यान सिनेमाच्या सेटवर कुणालाच कॅमेरा किंवा फोन आणण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मधुर भंडारकर सिनेमाच्या मुख्य नायिका आणि पाच मॉडेल्सविषयी कोणताही प्रचार करू इच्छित नाहीत. त्यांच्या मते, प्रचारचा एक असाही प्रकार असतो, की लोकांना सिनेमाची माहिती द्यायची परंतु सर्वकाही ओपन करायचे नाही. मधुर भंडारकर यांनी सिनेमाचे पोस्टर टि्वटरवर पोस्ट केले आहे.
फर्स्ट लूकमध्ये पाच मॉडेल्स गोल्डन बिकिनीमध्ये दिसत आहेत. सांगितले जातेय, की या मॉडेल्सना मधुर यांनी पाच विविध शहरांतून निवडले आहे. त्यामधील काहींनी मॉडेल इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे, काही नुकत्याच या क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत.
सिनेमाची कहानी मॉडेल्सच्या आयुष्याभोवती गुंफण्यात आली आहे. यापूर्वी मधुर भंडारकर यांनी फॅशन आणि सिनेसृष्टीवर सिनेमे बनवले आहेत. फॅशन इंडस्ट्रीवर आधारित मधुर यांच्या 'फॅशन' सिनेमाची बरीच प्रशंसा झाली होती. त्यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीवर 'हिरोइन' सिनेमा बनवला होता. सामान्य आणि हाय-प्रोफेशन आयुष्यातील वास्तव सिनेमातून समोर आणण्यात मधुर भंडारकर प्रसिध्द आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मधुर भंडारकर यांचे टि्वट...