आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : माधुरी दीक्षित झाली 'कोण होईल मराठी करोडपती'ची सह-सूत्रधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'कोण होईल मराठी करोडपती' या रिअॅलिटी शोच्या यंदाच्या पर्वाची थीम जोडी स्पेशल असल्याचे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. या शोच्या यंदाच्या आठवड्यात काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न कोण होईल मराठी करोडपतीने केला आहे. अवघ्या महाराष्ट्राची लाडकी माधुरी दीक्षित मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच या शोच्या सेटवर आली आणि जमलेल्या प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना जणू एखादे स्वप्न बघितल्यासारखे झाले. आपल्या आगामी 'गुलाब गँग' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने माधुरी या शोमध्ये सहभागी झाली होती.
एपिसोडच्या सुरुवातीला जशी घाई-गडबड सुरु असते अगदी तशीच सुरु होती. सचिन खेडेकर यांचे स्वागत झाले. त्यांनी माधुरी दीक्षितला मंचावर आमंत्रित केले आणि तो मादक आवाज आणि स्मित हास्य सेटवर दरवळले. यावेळी माधुरी हॉट सीटवर बसून खेळण्याचा आनंद घेईल, असं सगळ्यांना वाटलं. मात्र प्रेक्षकांसाठी होतं एक सरप्राईज. मराठी करोडपतीच्या हॉट सीटवर माधुरी स्पर्धक म्हणून नव्हे तर सह-सूत्रधार म्हणून विराजमान झाली. माधुरीला पहिल्यांदाच समोर पाहून हॉट सीटवर बसलेल्या विराज आणि सिद्धेश काणेकर स्वतःला विसरुन गेले. माधुरीने काणेकर बंधू तसेच जमलेल्या स्पर्धक आणि प्रेक्षकांशी उत्तम संवाद साधला.
'कोण होईल मराठी करोडपती'चा माधुरी दीक्षित स्पेशल एपिसोड येत्या 4 मार्चला रात्री नऊ वाजता प्रसारित होणार आहे.
शोमध्ये सहभागी झाल्याविषयी काय म्हणाली माधुरी, जाणून घ्या पुढील स्लाईडमध्ये...