(ममता अभियानच्या समारंभात माधुरी दीक्षितने या अभियानशी जोडलेल्या कार्यकर्त्यांता सन्मान केला.)
भोपाळ: मध्यप्रदेशच्या सरकारच्या स्वास्थ विभागव्दारा यूनिसेफ आणि एनएचआरएम (नॅशनल रुरल हेल्थ मिशन)च्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या ममता अभियानच्या दुस-या पर्वाची गुरूवारी (26 जून) सुरूवात झाली. याचे उद्धाटन सिनेअभिनेत्री आणि अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर माधुरी दीक्षितने केले. समन्वय भवनामध्ये आयोजित कार्यमध्ये मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, प्रदेशचे स्वास्थ मंत्री नरोत्तम मिश्रा आणि या मिशनशी जोडलेले अधिकारी उपस्थित होते. हे अभियान मध्य प्रदेशमध्ये मातृत्व आणि शिशु दर घटवण्यासाठी चालवण्यात येत आहे,.
माधुरी म्हणाली...
अभियानचा प्रारंभ करताना माधुरी दीक्षित म्हणाली, 'मला आनंद आहे, की मध्यप्रदेश सरकारने मला अभियानाशी जोडण्याची संधी दिली. तुम्ही लोक मला या अभियानाचे केवळ ब्रँड अॅम्बेसेडर समजू नका. मी या अभियानाशी जोडून सर्व कार्याकर्त्यांप्रमाणे काम करणार आहे. समाजात आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. महिलांनी सन्मान आणि सुरक्षा मिळवणे त्यांचा हक्क आहे.'
मुलींना द्या मुलांप्रमाणे वागणूक आणि सन्मान...
माधुरीने असेही सांगितले, की चांगला समाज आणि देश घडवण्यासाठी आपल्याला आपल्या घरापासून सुरूवात करावी लागेल. त्यासाठी आपल्या मुलींनी मुलांप्रमाणे सन्मान आणि वागणूक द्या. त्यांना आपल्या घरात स्वतंत्र वातावरण तयार करून द्यायला हवे.
मुलींनी आपल्या आहार आणि शिक्षणाची काळजी घ्यावी...
माधुरीने यावेळी असे सांगितले, की मुलींनी आपल्या आहाराची आणि प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. एक स्वस्थ तरुणीच पुढे चालून चांगले आणि कुंटुब आणि देश घडवू शकते. आहारासह मुलींनी आपल्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष द्यावे. मुलींना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वतंत्र्य दिले पाहिजे.
मी स्वत: एक आई आहे आणि आईचे महत्व समजते...
माधुरी म्हणाली, मी स्वत: एक आई आहे आईचे महत्व समजते. हे अभियान माझ्यासाठी एक मिशन आहे. त्याचा फायदा प्रत्येक गरजू महिलेला होईल. आई कुटुंबाची दोर असते. ती कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेते. कुटुंबातील सदस्यांनीसुध्दा तिची काळजी घ्यायला हवी.
मुलींचे कमी वयात लग्न करू नका
माधुरीने आई-वडिलांना असाही सल्ला दिला, की ममता अभियानाचा लाभ घेतलास मी दाव्यासह सांगू शकते, की 80 टक्के महिलांचे प्राण वाचू शकतात. सर्वांना माझी विनंती आहे, की कमी वयात मुलींचे लग्न करू नका. कमी वयात मुली आई होण्याची महत्वपूर्ण जबाबदारी पेलू शकत नाही. स्वस्थ समाज घडवण्यासाठी या गोष्टी महत्वाच्या आहेत.
मातृ-मृत्यू दरात घट झाली
मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितले, की मागील काही वर्षांच्या आकड्यांवर एक नजर टाकली तर मध्यप्रदेशने मातृ-मृत्यू दरात घट केली आहे. परंतु आम्हाला हे समाधानकारक आहे असे मानून शांत बसू नका. हा आकडा आपल्याला सर्वांना मिळून आणखी कमी करायचा आहे. आपल्या समाजात आजही मुलांना जास्त महत्व दिले जाते या गोष्टीचे मला खूप दु:ख आहे. माझे उपस्थित आईंना निवेदन आहे, की आपल्या मुलींच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. तसेच लिंक परिक्षण हा एक गंभीर गुन्हा आहे, हा गुन्हा थांबवण्यासाठी सरकारची मदत करा.
माधुरी दीक्षित गुरूवारी (26 जून) सकाळी भोपाळ पोहोचली. ती येताच तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. शेकडोच्या संख्येत उपस्थित लोकांनी काही तास उभे राहून माधुरीची वाट पाहिली. माधुरीने एंट्री कराताच चाहत्यांना हात हलवून अभिवादन केले. यावेळी ती लेमन रंगाच्या अनारकली सुटमध्ये दिसली. तिची वाट पाहणा-या चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तिचे स्वागत केले.
फोटो: अनिल दीक्षित