आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhuri Dixit Photoshoot For Hello Magazine In Jaipur Rajasthan

गायत्री देवीच्या लूकमध्ये दिसली माधुरी दीक्षित, मॅगझिनसाठी केले PHOTOSHOOT

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून माधुरी दीक्षित आणि गायत्री देवी
('हॅलो' या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मासिकासाठी माधुरीने जयपूरची रजवाडा ज्वेलरी घातली आहे. माधुरीचा हा लूक माजी राजमाता गायत्री देवीशी साधर्म्य साधणारा आहे.)
जयपूर - बालपणापासूनच माधुरी दीक्षितचे एखाद्या राजकुमारीप्रमाणे दिसण्याचे स्वप्न होते. एकदा शाळेतील एका नाटकात तिला ही संधीसुद्धा मिळाली. मात्र तिचे बालपणीचे हे स्वप्न अलीकडेच जयपूरमध्ये पूर्ण झाले. माधुरी केवळ राजकुमारीप्रमाणे तयारच झाली नाही, तर लिलीपूल आणि राज विलासमध्ये पार पडलेल्या फोटोशूटमध्ये तिने काही क्षण महाराणी गायत्री देवीप्रमाणे व्यतित केले.
हॅलो मॅगझिनच्या वतीने या फोटोशूटच्या माध्यमातून गायत्री देवीला ट्रिब्यूट देण्यात आले आहे. यावेळी माधुरीने लिलीपूलमध्ये गायत्री देवीच्या विंटेज कारसोबतही फोटोशूट केले.य येथे ती पोलो ड्रेसमध्ये दिसत आहे. ही विंटेज कार माजी महाराणी गायत्री देवीची खासगी गाडी होती.
रिअॅलिस्टिक फिल देण्यासाठी निवडली विंटेज कार...
या फोटोशूटसाठी माधुरी खास जयपूरमध्ये आली होती. माधुरीचे हे फोटोशूट रिअॅलिस्टिक वाटण्यासाठी महाराणीची विंटेज कार वापरण्यात आली. या फोटोशूटमध्ये माधुरीने गायत्री देवीच्या अंदाजात साडी आणि पर्लचा नेकलेस गळ्यात घातला आहे. शिवाय गायत्री देवी आणि मानसिंह यांची फोटोफ्रेमसुद्धा दिसत आहे.
रजवाडी ज्वेलरी आणि माधुरी
राज विलासमध्ये पार पडलेल्या फोटोशूटमध्ये माधुरी आपल्या एव्हरग्रीन एलिगेंसमध्ये दिसत आहे. यलो डायमंड, पर्ल, एमरल्ड आणि रुबी नेकलेस माधुरीने या फोटोशूटसाठी वापरले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा माधुरीच्या या खास फोटोशूटची छायाचित्रे...