आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO : माधुरीने लपून छपून बघितला ताजमहाल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित अलिकडेच पती आणि मुलांबरोबर आग्रामध्ये ताजमहाल बघायला गेली होती. मात्र माधुरीने लपूनछपून ताजचे दर्शन घेतले. यावेळी माधुरीने आपला चेहरा स्कार्फने झाकला होता.
माधुरीने सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवर आपल्या कुटुंबाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या छायाचित्रात माधुरी पती श्रीराम नेने आणि मुलांसह ताजमहालसमोर उभी दिसत आहे. छायाचित्राखाली माधुरीने एक कॅप्शनसुद्धा लिहिले आहे. 'मी आपला वेश बदलून कुटुंबाबरोबर ताजमहाल पाहिला.'
छायाचित्रात माधुरी जांभळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाच्या जीन्स मध्ये दिसत आहे.
माधुरी गेल्यावर्षी आपल्या कुटुंबाबरोबर भारतात स्थायिक झाली. सध्या माधुरी 'झलक दिखला जा' या डान्स रिएलिटी शोच्या पाचव्या पर्वाचे परिक्षण करत आहे. याशिवाय 'गुलाब गँग' आणि 'इश्किया २'मध्येही लवकरच माधुरी झळकणार आहे.