आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Madhurima Tuli To Play Akshay Kumars Wife In Baby Movie

PHOTOS : 'बेबी'मध्ये बनली अक्षयची पत्नी, जाणून घ्या कोण आहे ही अभिनेत्री?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री मधुरिमा तुली)
मुंबईः दिग्दर्शक नीरज पांडे यांचा अॅक्शन थ्रिलर धाटणीचा 'बेबी' हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. या सिनेमाद्वारे मधुरिमा तुली या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यापूर्वी मधुरिमा कमर्शिअल जाहिरातींमध्ये झळकली आहे. 'बेबी'मध्ये मधुरिमाने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
मधुरिमा टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून ‘कस्‍तूरी’, ‘झांसी की रानी’, ‘परिचय’, रंग बदलती ओढनी या मालिकांमध्ये झळकली आहे. मधुरिमाने झीटीव्ही वाहिनीवरील 'कुमकुम भाग्य' या मालिकेतील तनू ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. आता तिने ही मालिका सोडली आहे,
जाणून घ्या कोण आहे मधुरिमा...
महिन्द्रा, गोदरेज, फियामा डी विल्स, कार्बन मोबाइल या प्रसिद्ध ब्रॅण्ड्सच्या जाहिरातींमध्ये मधुरिमाने काम केले आहे. याशिवाय ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तेलगू, तामिळ आणि कानडी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. मधुरिमाचा जन्म देहरादून येथे झाला. तिचे वडील टाटा स्टील कंपनीत कामाला असून आई एनजीओसाठी काम करते. मधुरिमाला एक धाकटा भाऊ आहे. सथथा (2004) या तेलगू सिनेमाद्वारे मधुरिमा पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मधुरिमा तुलीची खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातील निवडक छायाचित्रे...