आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtracha Favorite Kaun ? Award Function Held In Mumbai

'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ?'वर 'दुनियादारी'चे वर्चस्व, बघा सोहळ्याचे खास PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांना आपलंस करणा-या कलावंतांना दिला गेलेला मानाचा मुजरा म्हणजे, 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ?' हा सन्मानसोहळा. झी टॉकीज आयोजित हा सन्मान सोहळा रसिकांनी दिलेल्या मतांवर अवलंबून असतो. ज्यात अवघ्या पंधरवाड्यातच आलेला रसिकांचा प्रतिसाद आणि त्यानुसार जाहीर झालेल्या निकालावर 'दुनियादारी' या सिनेमाने आपला यशस्वी ठसा उमटवला आहे. हा अनोखा सन्मान सोहळा नुकताच सांताक्रूझ येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मराठी सिनेसृष्टीतील तारे-तारकांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला. 'दुनियादारी' या सिनेमाने आपली मोहोच सा-याच विभागात दर्शवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
रसिकांनी नोंदवलेल्या सर्वोच्च मतांनुसार, यंदाचा फेव्हरेट सिनेमा दुनियादारी ठरला असून फेव्हरेट नायकाचा आणि नायिकेचा मान अनुक्रमे स्वप्निल जोशी आणि सई ताम्हणकर यांनी पटकावला. फेव्हरेट दिग्दर्शकाचा मान संजय जाधव यांना तर सहाय्यक पुरुष आणि स्त्री व्यक्तिरेखेकरिता अनुक्रमे अंकुश चौधरी आणि उर्मिला कानेटकर यांना 'दुनियादारी' या सिनेमासाठी मिळाला.
जितेंद्र जोशीने 'दुनियादारी'तील आपल्या हुकुमी अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्राच्या फेव्हरेट खलनायकाची उपाधी मिळवली. तर विनोदी व्यक्तिरेखेकरिता 'खो खो' या सिनेमासठी सिद्धार्थ जाधवने बाजी मारली.
'दुनियादारी'तील 'टिक टिक वाजते... ' या फेव्हरेट गीतासाठी तसेच पार्श्वगायनासाठी सोनू निगम आणि सायली पंकज यांना फेव्हरेट गायक-गायिकाचा मान लाभला.
'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ?' यातील पॉप्युलर फेस या विभागातही सई ताम्हणकरने तर फेव्हरेट आयकॉन स्टाईल म्हणून स्वप्निल जोशीने बाजी मारली.
झी टॉकीजच्या या सन्मान सोहळ्यात विशेष गाजला तो सचिन पिळगावकर यांचा नृत्याविष्कार. याशिवाय मानसी नाईक, सिद्धार्थ जाधव, संतोष जुवेकर, सोनाली कुलकर्णी आणि मृण्मयी देशपांडे यांच्याही परफॉर्मन्सने कार्यक्रम विशेष उल्लेखनीय ठरला. सोबतच भाऊ कदम, वैभव मांगले, संदीप पाठक आणि शर्वाणी पिल्ले यांची तुफान कॉमेडी आणि पुष्कर श्रोत्री-स्वप्नील जोशी यांच्या दिलखुलास सुत्रसंचालनाने उपस्थितांची दाद मिळवली.
पुढे क्लिक करा आणि बघा या अवॉर्ड सोहळ्याची खास झलक...