(सिनेमाचे पोस्टर)
मुंबई: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रासिंग धोनीच्या बायोपिक सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात धोनीच्या पात्रआत सुशांत सिंह राजपूत दिसणार आहे. या सिनेमात त्याचे नाव 'M.S. Dhoni The Untold Story' ठेवण्यात आले आहे. सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे.
धोनीच्या बोयपिकचा हा सिनेमा नीरज पांडे दिग्दर्शित करत आहे. त्याने यापूर्वी 'ए वेडनेस डे' आणि 'स्पेशल 26'सारखे सिनेमा बनवले आहेत. हा सिनेमा 2015मध्ये रिलीज होत आहे. सिनेमाची रिलीज डेट अद्याप निश्चिच झालेली नाहीये. धोनीचे पात्र साकारणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत 'काई पो छे' सिनेमात मुलांना क्रिकेटचे धडे देताना दिसला होता. त्याची लास्ट रिलीज 'शुध्द देसी रोमान्स' होता. सुशांत
आमिर खानसह '
पीके'मध्ये दिसणार आहे.
कसा आहे फर्स्ट लूक?
सिनेमाच्या फर्स्ट लूकमध्ये सुशांत सिंह राजपूतने खांद्यावर बॅट घेतलेली आहे. बॅटवर माही (MAHI) लिहिलेले दिसते. सोबतच, सुशांतने 7 नंबरची
टीम इंडियाचा टी-शर्ट परिधान केलेला आहे. या शर्टवर इंग्रजीमधून 'DHONI' आणि नंबर 7 लिहिलेले आहे. या पोस्टरकडे पाहून असे, की धोनी स्वत: बॅट खांद्यावर घेऊन उभा आहे.
साक्षीने केले टि्वट
धोनीची पत्नी साक्षीने टि्वटरवर सिनेमाचे पोस्टर अपलोड करून टि्वट केले, 'Clearing out all those rumours being carried out past few days.It was all false.. Here you go ....BOOM !!!'
पुढील स्लाइड्सवरल क्लिक करून पाहा सिनेमाचे पोस्टर आणि साक्षीचे टि्वट...