आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahesh Bhatt And Parveen Babi's Heart Touching Love Story

परवीनच्या मनात होती अनामिक भीती, अमिताभ बच्चन यांना समजायची शत्रु!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये ऑफस्क्रिन आणि ऑनस्क्रिन प्रेमाचे अनेक किस्से आपण ऐकलेले आहेत. परंतु काही लव्हस्टोरी अशाही आहेत त्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्या डोक्यात फिट बसतात. अशीच एक कहाणी आहे, ती म्हणजे महेश भट्ट आणि गतकाळातील अभिनेत्री परवीन बॉबी यांच्या प्रेमाची. ही इंडस्ट्रीमध्ये चर्चेतील लव्हस्टोरी आहे.
अलीकडेच, 'फिल्मफेअर' या प्रसिध्द मासिकाला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट यांनी अभिनेत्री परवीन बॉबीसोबतच्या अफेअर ते ब्रेकअपपर्यंत सर्व गोष्टींचा खुलासा केला. यावेळी त्यांनी परवीनच्या आयुष्य आणि मृत्यूवर दुखसुध्दा व्यक्त केले. आजारपणामुळे परवीनची मानसिकता स्थिती इतकी बिघडली होती, की ती अमिताभ बच्चन यांना आपला शत्रु समजायला लागली होती. बिग बींसोबत अनेक सुपरहिट सिनेमे देणा-या परवीनला वाटायचे, की अमिताभ तिला जिवे मारणार आहे.
यशस्वी करिअरच्या वाटेवर असताना केले महेश भट्ट यांच्यावर प्रेम
परवीन आपल्या करिअरमध्ये टॉप अभिनेत्रींमध्ये सामील होती. तेव्हा ती महेश भट्ट यांच्या नात्यात होती. 1977मध्ये दोघांचे प्रेम संबंध वाढले. त्यावेळी महेश भट्ट मात्र विवाहीत होते. तसेच, परवीनसुध्दा कबीर बेदीसोबतच्या ब्रेकअमधून बाहेर पडत होती. त्यांनी लिव्ह-इनमध्ये राहण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी परवीन 'अमर अकबर अँथनी' आणि 'काला पत्थर' सिनेमांची शुटिंग करत होती. दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आले होते, की त्यांच्यामध्ये केवळ प्रेमाला स्थान होते. दोघे जेव्हा एकत्र असायचे तेव्हा सर्व कामे आणि स्टारडम मागे पडत होते. परवीन महेश यांच्यावर जिवापाड प्रेम करत होती. परंतु या प्रेमाचा अंत खूप वाईट झाला.
पुढे वाचा, महेश यांना अचानक आयुष्याच्या कोणत्या सत्याची ओळख झाली?