आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahesh Bhupati Ad Lara Dutta Become Proud Parents Of A Baby Girl

लारा दत्ता-महेश भूपती दांपत्‍याला 'कन्‍या रत्‍न'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी विश्वसुंदरी लारा दत्ता व टेनिसपटू महेश भूपती दांपत्याच्‍या घरी कन्‍यारत्‍न जन्‍माला आले आहे. ही गोड बातमी स्‍वतः महेश भूपतीने ट्विटरवरून दिली आहे.
"इटस्‌ अ गर्ल !!!!!, आय लव्ह यू लारा दत्ता,' अशी शब्दांमध्‍ये भूपतीने पिता झाल्‍याचा आनंद व्‍यक्त केला. लारा व महेश 16 फेब्रुवारी 2011 रोजी विवाहबद्ध झाले होते. लारा दत्ता 2000 मध्ये विश्वसुंदरी झाली होती. भूपतीने ही गोड बातमी ट्विटरवरुन दिल्‍यानंतर बॉलिवूडने शुभेच्‍छांचा वर्षाव केला. अभिनेत्री बिपाशा बसूने दोघांचे अभिनंदन केले. तर अभिनेता राहुल बोस याने दांपत्‍याला शुभेच्‍छा देताना म्‍हटले आहे, लारा दत्ता आणि महेश भूपतीला खुप खुप शुभेच्‍छा. या ही गोड बातमी साजरी करतानाच महेशने ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धेत त्‍याचा आजचा सामनाही जिंकला.
याशिवाय नेहा धुपिया आणि मॉडेल-गायिका सोफी चौधरी यांनीही दोघांना शुभेच्‍छा दिल्‍या.