आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षपदी चित्रपट कलावंतांची नियुक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या उपाध्यक्षपदी मराठी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजेरेकर, अभिनेते अतुल परचुरे, विनय येडेकर, दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते संजीव देशपांडे यांचा समावेश आहे. हे सर्वजण मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्य पाहातील, अशी माहिती मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिली.

यापूर्वी विलास सुद्रिक या पदावर विराजमान होते. मात्र अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या सेटच्या तोडफोड प्रकरणी विलास सुद्रिक याला मोठी किंमत चुकवावी लागली. सुद्रिक याची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर आता, मनसे चित्रपट कर्मचारी सेनेत मोठे फेरबदल केल्याचं पक्षाकडून जाहीर करण्यात आलं.