बॉलिवूडमध्ये आपल्या आईवडिलांचा अभिनयाचा वारसा पुढे चालवण्याचा ट्रेंड तसा जुनाच. येथे अनेक सेलिब्रिटी किड्सनी आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केले. आता हाच ट्रेंड हळूहळू मराठी सिनेसृष्टीतही दिसून येतोय. काही दिवसांपूर्वीच अभिनेते सचिन पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर हिने 'एकुलती एक' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. आता आणखी काही कलाकारांची मुले एकत्रितपणे सिने क्षेत्रात पदार्पण करत आहेत. मनवा नाईक दिग्दर्शित आगामी 'पोरबाजार' या सिनेमातून महेश मांजरेकर, मनोज जोशी, अतुल आणि सोनिया परचुरे या कलाकारांची मुले रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहेत.
सत्या मांजरेकर हा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा असून सखील परचुरे ही अतुल आणि सोनिया परचुरे यांची मुलगी आहे. तर धर्मज जोशी हा मराठी व हिंदी सिनेमांमधील प्रसिद्ध कलाकार मनोज जोशी यांचा मुलगा आहे. अलीकडेच मुंबईत या सिनेमाचा फस्ट लूक रिलीज करण्यात आला. यावेळी आपल्या मुलांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे आईवडील आवर्जुन हजर होते.
काय आहे 'पोर बाजार' सिनेमाची स्टोरीलाइन...
‘पोर बाजार’ हा एक धमाल सिनेमा आहे. ही कथा पाच तरूणांची... अजय, मंजिरी, समर, विशाल आणि रागिणी अशी त्यांची नावे... कॉलेजमध्ये शिकणारी ही तरुण गॅंग नेहमीच लेक्चर बंक करून धमाल मस्ती करत असतात. अचानक असेच एकदा लेक्चर बंक करून ते एका घरात शिरतात आणि सुरू होतो एक अॅडव्हेंचर प्रवास...
या स्टार किड्ससह आणखी कोणकोण आहेत या सिनेमात...
या धमाल कथानकात सत्या मांजरेकर, सखील परचुरे, धर्मज जोशी यांच्यासह अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, चित्रा नवाथे, स्वानंद किरकिरे, प्राजक्ता दिघे, कमलाकर नाडकर्णी, शंतनु गव्हाणे, विकास पाटील, अनुराग वोरलीकर, स्वारंगी मराठे, आणि मृणाल पंतवैद्य यांच्याही महत्वाच्या भूमिका बघायला मिळणार आहे.
पुढील स्लाईड्वर क्लिक करा आणि भेटा महेश मांजरेकर, मनोज जोशी आणि अतुल परचुरे यांच्या मुलांना...