आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day: शाहरुखसह काम करून या अभिनेत्रीने इंडस्ट्रीमध्ये केली होती धमाकेदार एंट्री, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी)
मुंबई: 1997मध्ये प्रदर्शित झालेल्या सुभाष घई यांच्या 'परदेस' सिनेमाने रात्रीतून एका अनोळखी चेह-याला स्टार बनवले. ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री महिमा चौधरी आहे. पहिल्याच सिनेमात बॉलिवूड स्टार शाहरुख खानसह काम करून लोकप्रियता मिळवली. या सिनेमाचे तिला जास्त काही फायदा झाला नाही. आज महिमा चौँधरीचा वाढदिवस आहे. खूप कमी लोकांना ठाऊक आहे, की महिमाचे खरे नाव ऋतू चौधरी आहे.
13 सप्टेंबर 1973 रोजी महिमा चौधरीचा जन्म दाजीलिंगमध्ये झाला होता. महिमाने आपल्या मॉडेलिंग करिअर ऋतू चौधरी नावाने सुरु केले होते. 'परदेस' सिनेमात सुभाष घईने तिला भूमिकाच नव्हे महिमा हे नावदेखील दिले. 'परदेस' सिवेमाक काम करण्यापूर्वी महिमा एका जाहिरातीतसुध्दा झळकली आहे. याच जाहिरातीत महिमाला पाहून सुभाष घई यांनी तिला आपला सिनेमा साइन करून घेतला होता.
'दाग द फायर'मध्येसुध्दा मिलाळी प्रशंसा
'परदेस' सिनेमानंतर 'दाग द फायर'मध्येसुध्दा तिने चांगला अभिनय केला होता. 'धडकन' सिनेमात महिमाने सेकंड लीद साकारली होती. महिमाने 'दिल क्या करे' आणि 'लज्जा'सारखे काही आठवणीत ठेवण्यासारखे सिनेमे आहेत.
'गुमनाम'मध्ये काम करून गायब झाली महिमा
महिमा चौधरीचा 2008मध्ये आलेला 'गुमनाम- द मिस्ट्री' हा तिच्या करिअरचा शेवटचा सिनेमा आहे. महिमाचे अनेक अभिनेत्यांसह नाव जोडल्या गेले आहे. महिमा चौधरी 2006मध्ये बॉबी मुखर्जीसह लग्न करून ती वैवाहिक आयुष्य जगत आहे. बॉबी व्यवसायाने एक आर्किटेक्ट आहे. अलीकडेच, त्यांच्या घटस्फोटाच्याही बातम्या माध्यमांमध्ये आल्या. महिमाला आर्यन नावाची मुलगा आहे.
सुभाष घई यांच्यावर लावला होता कास्टिंग काउचचा आरोप
महिमा चौधरीने काही वर्षांपूर्वी महिमाने अप्रत्यक्षरित्या सुभाष घई यांच्या कास्टिंग काउचचा आरोप लावला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बर्थडे गर्ल महिमा चौधरीची काही खास छायाचित्रे...