आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Main Tera Hero Success Party Hosted By Ekta Kapoor

‘मैं तेरा हीरो’च्या सक्सेस बॅशमध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी, बघा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 4 एप्रिल रोजी रिलीज झालेल्या डेविड धवन दिग्दर्शित 'मैं तेरा हीरो' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस करत आहे. सिनेमाचे हे यश साजरे करण्यासाठी 9 एप्रिल रोजी मुंबईतील जुहू येथे सिनेमाची सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीची होस्ट होती या सिनेमाची निर्माती एकता कपूर. या सक्सेस बॅशमध्ये अनेक सेलेब्स दिसले.
कोणकोण पोहोचले?
वरुण धवन, इलियाना डिक्रूज, सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरैशी, आलिया भट्ट, अर्जुन कपूर, पूजा भट्ट, साजिद, वाजिद, सौरभ शुक्ला, तिग्मांशु धूलिया, राजपाल यादव, कृतिका, अरुणोदय सिंह, प्रभुदेवा, दिव्या दत्ता, डेविड धवन, तुषार कपूर, करिश्मा तन्ना, सोफी चौधरी, एवलिन शर्मा, जॅकी भगनानीसह बरेच सेलेब्स या पार्टीत दिसले.
या पार्टीत एकता कपूरने सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित केले. पार्टीत एकता खूप आनंदी दिसत होती. तिने फोटोग्राफर्सला भरपूर पोझ दिले.
हा एक रोमँटिक, अॅक्शन आणि कॉमेडी सिनेमा आहे. वरुण धवन, इलियाना डिक्रूज आणि नर्गिस फाखरी या सिनेमात मेन लीडमध्ये आहेत.
सिनेमाच्या स्टोरीलाईनविषयी सांगायचे झाल्यास, वरुण धवनचे इलियाना डिक्रूजवर प्रेम असते. इलियानासह लग्न करण्याची त्याची इच्छा असते. याचदरम्यान या दोघांत एका व्हिलनची एन्ट्री होते. हा व्हिलन अभिनेता अरुणोद्य सिंहने साकारला आहे. तो एक भ्रष्ट पोलिस अधिकारी आहे. अरुणोद्य कोणत्याही परिस्थितीत इलियानाशी लग्न करु इच्छितो. यासाठी तो बळजबरीसुद्धा करतो. नर्गिस फाखरीची एन्ट्री झाल्यानंतर कहाणीत ट्विस्ट येतो. नर्गिसचे वरुणवर जीवापाड प्रेम असते. शेवटी वरुणचे लग्न कुणाशी होणार हे सिनेमातच बघणे इंट्रेस्टिंग ठरणार, नाही का?
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'मैं तेरा हीरो'च्या सक्सेस पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची खास झलक...