आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Makarand Dandawate Article About Film, Divya Marathi

चित्रपटांची बदलती दुनिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्थिक उदारीकरणानंतर समाजातही गरिबीचे ‘गिल्टी फिलिंग’ जाऊन श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची चढाओढ लागली. अमिताभ, मिथुनच्या काळातील हिंदी सिनेमांचा गरीब नायक उच्चशिक्षित, श्रीमंत होत गेला.
स. भु. कॉलेजकडे जाताना नाथ मंदिराच्या भिंतीवर एकदा पोस्टर झळकले. पांढर्‍या स्वच्छ पार्श्वभूमीवर हाताच्या मुठीत सायकल चेन. खाली इंग्रजीत लिहिलेले शिवा. तीच गोष्ट आशिकीची डोक्यावर ब्लेझर पांघरलेले तरुण व तरुणी. अत्यंत आकर्षक, वेगळ्या धाटणीची ही पोस्टर्स म्हणजे हिंदी चित्रपटातील बदलाची चाहूल होती. मिथुन चक्रवर्ती स्टाइलचे मारधाडपट, धमेंद्र-जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हासारख्या वयस्कर नायकांच्या मल्टिस्टार कास्ट चित्रपटांच्या युगाचा अस्त झाला होता. त्या काळी औरंगाबादेत 12 चित्रपटगृहे होती. त्यापैकी मोजक्या चित्रपटगृहांमध्ये फोर ट्रॅक साऊंड सिस्टिम उपलब्ध होती. 90चे दशक राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रातही उलथापालथ करणारे ठरले. अंकुश, तेजाब, शिवासारखे मध्यमवर्गीय, बेकारीने त्रस्त म्हणून गुन्हेगारीकडे वळणारे नायक आले; परंतु आर्थिक उदारीकरणानंतर हिंदी सिनेमांचा नायक उच्चशिक्षित, श्रीमंत होत गेला. समाजातही गरिबीचे ‘गिल्टी फीलिंग’ जाऊन श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची चढाओढ लागली.समांतर सिनेमा अस्तंगत होत गेला. सिनेमा तांत्रिकदृष्ट्या हॉलीवूडशी स्पर्धा करायला लागला. हिंदी चित्रपटसृष्टी आता ‘बॉलीवूड’ झाली. एकेकाळी बिग बजेट चित्रपट खरेदी करण्याची क्षमता नसल्याने एकच सिनेमा दोन -तीन थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायचा. चित्रपटाची रिळे एका टॉकीजमधून दुसर्‍या टॉकीजमध्ये न्यावी लागायची. त्यामुळे प्रत्येक टॉकीजच्या शोची वेळ अर्धा तास उशिरा ठेवावी लागायची. रांगेत उभे राहून तिकिटे काढावी लागायची. आता सिनेमा पाहण्यासाठी अनेक पर्याय झाल्याने सिनेमाचे कौतुक राहिले नाही.
औरंगाबादेत 12 चित्रपटगृहे होती. त्यापैकी मोजक्या चित्रपटगृहांमध्ये फोर ट्रॅक साऊंड सिस्टिम उपलब्ध होती.

एकच सिनेमा दोन-तीन थिएटरमध्ये प्रदर्शित व्हायचा. चित्रपटांची रिळे एका टॉकीजमधून दुसर्‍या टॉकीजमध्ये न्यावी लागायची. त्यामुळे प्रत्येक टॉकीजच्या शोची वेळ अर्धा तास उशिरा ठेवावी लागायची.