आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'PK'साठी आमिरने बदलले अनेक लूक, रस्त्यावरील लोकांचे कपडे केले परिधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 'पीके' नाव ऐकताच आमिर खानचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. आतापर्यंत आमिरच्या सर्व सिनेमांची तुलना केली तर हा सिनेमा काहीतरी वेगळा असल्याचे दिसते. विचित्र लूकमध्ये दिसणा-या आमिरच्या या सिनेमाची कहाणी काही औरच आहे.

सिनेमाच्या पोस्टरपासून टीजरपर्यंत आमिर खानला पाहिल्यानंतर सर्वांनाच एक प्रश्न पडला की 'पीके'चा अर्थ नेमका काय असेल? या पात्राची रचना कुठे आणि कशी झाली. 'पीके' असे कपडे का परिधान करतो. मोठे-मोठे डोळे आणि कान, दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांना ही कल्पना कशी सुचली असावी. त्यामधील अनेक प्रश्नांचे उत्तर आमिर खानने आपल्या ऑफिशिअल यू-ट्यूबरवरील पेजवर 'पीके'च्या पात्राचा मेकिंग व्हिडिओ अपलोड केला आहे.

सोपी नव्हती 'पीके'ची कल्पना
'पीके'चे दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि लेखक अभिजीत जोशी आहेत. दोघांनी सांगितले, की सिनेमाच्या पटकथेवर पीकेची कल्पना करणे सोपे नव्हते. त्याला व्हिज्युअलच्या माध्यमातून पडद्यावर कसे आणले जाईल हे कल्पनेबाहेरचे होते. कारण अशाप्रकारचे चरित्र कुणी कधीच दाखवले नाही. दोघांना केवळ इतकेच ठाऊक होते, की पीके एक निरागस मुलगा दिसायला हवा. त्यात आमिर खानपेक्षा दुसरे कुणीच हे पात्र चांगले साकारू शकणार नाही, असे त्यांच्या मनात आले.

'पीके' बनण्यासाठी आमिरने केले अनेक लूक

आमिरला 'पीके'ची पटकथा ऐकवण्यात आली, तेव्हा तो खूप उत्साही झाला. तेथून आमिरला पीके बनवण्याचा प्रवास सुरु झाला. कुणालाच ठाऊक नव्हते पीकेला कसे सादर करायचे आहे. त्यासाठी आमिरला अनेक लूक देण्यात आले. विशेषत: त्याला अनेक हेअरस्टाइल देण्यात आल्या. आमिरला या पात्रासाठी लांब केस हवे होते. परंतु जास्त बदल त्यालाही नको होता. सिनेमासाठी त्याने खूप कमी ठेवला आणि डोळ्यांमध्ये ग्रीन लेन्स लावले.

कान मोठे दिसावे यासाठी करण्यात आला मेकअप

पीकेच्या पात्रासाठी आमिरला आपले कान मोठे करायचे होते. तसे पाहता, त्याचे कान पहिल्यापासूनच मोठे आहेत. परंतु आणखी मोठे हवे होते त्यासाठी त्याच्या कानांवर मेकअप करण्यात आला. तसेच, कानामागे सपोर्च लावण्यात आला.

'पीके'ने परिधान केले इतरांचे कपडे
पीकेच्या कपड्यांची जेव्हा निवड करण्यात येत होती, तेव्हा आमिरला अनेक प्रकारचे कपडे घालून पाहावे लागले. मात्र, त्या कपड्यांमध्ये पीकेचे पात्र उठून दिसत नव्हते. सिनेमाच्या कॉस्ट्युम टीमला रस्त्यावर फिरायला सांगितले. जेणेकरून ज्या लोकांच्या अंगावर वेगळे कपडे दिसतील ते आणायचे. टीमने वेगळे कपडे दिसणा-या लोकांना नवीन कपडे देऊन त्यांचे वापरलेले कपडे घेतले. अर्थातच आमिरने इतरांचे वापरलेले कपडे सिनेमात परिधान केले आहेत.

'पीके'ची फायनल टेस्ट

अनेक गोष्टींवर विविध शक्कल लढवून काम केल्यानंतर पीकेला जेव्हा कॅमे-यासमोर आणले, तेव्हा सर्वकाही ठिक दिसत होते. मात्र आमिरला काहीतरी कमतरता जाणवत होती. त्यावेळी डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करून डोळे मोठे करण्यास सांगितले. त्याचा हा शॉट सर्वांना परफेक्ट वाटला. अशाप्रकारे पीकेसाठी विविध कल्पना करण्यात आल्या आणि त्या पडद्यावर उतरवल्या गेल्या.

कोण आहे 'पीके'?

'पीके'च्या पात्राला मोठ्या मेहनतीनंतर पडद्यावर आणले. परंतु पीके कोण आहे? हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. स्वत:नेसुध्दा 'पीके'विषयी एक शब्द सांगितला 'सस्पेन्स'.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आमिरच्या 'पीके' बनण्याचा प्रवासाचा व्हिडिओ आणि छायाचित्रे...
(मेकिंगचा व्हिडिओ दुस-या स्लाइडवर आहे.)