आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Instagramवर दिसली मलायकाच्या खासगी आयुष्याची झलक, पाहा 35 PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इंस्टाग्राम अकाऊंटवरुन घेण्यात आलेले मलायका अरोरा खानचे छायाचित्र)
मुंबई - इंस्टाग्राम अकाऊंटवर खासगी आयुष्यातील छायाचित्रे पोस्ट करण्यात बॉलिवूड सेलिब्रिटी अॅक्टिव झाले आहेत. एखाद्या टूरपासून ते सिनेामचे प्रमोशन, सेल्फीपर्यंत, स्टार्स आपला प्रत्येक अंदाज येथे शेअर करतात. याच कारणामुळे आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची झलक बघण्यासाठी इंस्टाग्राम हे चाहत्यांसाठी एक चांगले माध्यम ठरत आहे.
बॉलिवूडची आयटम क्वीन मलायका अरोरा खान नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. जेवढे लक्ष ती आपल्या नृत्यावर देते, तेवढेच लक्ष ती आपल्या परिधानावरसुद्धा देते. ती नेहमी आपला नवीन लूक कॅमे-यात कैद करत असते. पूर्वी मलायका फेसबुक आणि ट्विटरवर स्वतःची छायाचित्रे अपलोड करायची. मात्र आता ती इंस्टाग्रामवर छायाचित्रे शेअर करताना दिसते.
मलायकाने अलीकडे आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जी छायाचित्रे शेअर केली आहेत, त्यामध्ये शॉर्ट्स ड्रेसमधील छायाचित्रांपासून ते भटकंतीच्या छायाचित्रांचा समावेश आहे. काही छायाचित्रांमध्ये ती आपल्या मुलासह दिसत आहे. आउटिंग करताना मलायका भरपूर धमाल करते, हे तिच्या छायाचित्रांना बघून लक्षात येते.
काय आहे इंस्टाग्राम?
इंस्टाग्राम ऑनलाइन मोबाइल फोटो शेअरिंगचे माध्मम आहे. ज्याप्रकारे फेसबुक, ट्विटर आणि फ्लिकरवर फोटो शेअर केले जातात. अगदी त्याचप्रमाणे हे अप्लिकेशन काम करतं. फोटोसह व्हिडिओ शेअर करण्याची सोय या अप्लिकेशनमध्ये आहे. इंस्टाग्राम हे अप्लिकेशन केविन सिस्ट्रोम आणि माइक क्रिगर यांनी 2010 मध्ये लाँच केले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मलायकाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन घेण्यात आलेली ही खास छायाचित्रे...