आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallika Shakes A Leg During \'Dirty Politics\' Promotions

PHOTOS : बॅकलेस चोळी आणि घागरा परिधान करुन मल्लिकाने लावले ठुमके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री मल्लिका शेरावत)

मुंबईः मल्लिका शेरावत ब-याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्या आगामी सिनेमाचे नाव आहे 'डर्टी पॉलिटिक्स'. सिनेमाची रिलीज डेट जवळ आल्याने सध्या ती सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. याच निमित्ताने मंगळवारी मुंबईत आयोजित प्रमोशनल इव्हेंटमध्ये ती सहभागी झाली होती. यावेळी तिच्यासोबत सिनेमाचे दिग्दर्शक के.सी. बोकाडिया दिसले.
इव्हेंटमध्ये मल्लिका राजस्थानी घागरा आणि बॅकलेस चोळीत दिसली. याच कार्यक्रमात सिनेमाचे म्युझिक लाँचदेखील करण्यात आले. यावेळी मल्लिकाने 'घागरा' या गाण्यावर थिरकली.
'डर्टी पॉलिटिक्स' हा सिनेमा भंवरी देवी सेक्स स्कॅण्डलवर आधारित आहे. या सिनेमात मल्लिकाने अनोखी देवीची भूमिका साकारली आहे. जॅकी श्रॉफ, अनुपम खेर, आशुतोष राणा, राजपाल यादव, सुशांत सिंह, नसीरुद्दीन शाह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत. 13 फेब्रुवारी रोजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा म्युझिक लाँच आणि प्रमोशनल इव्हेंटची खास छायाचित्रे...