आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallika Sherawat's Dirty Politics Courts Controversy Yet Again!

भंवरी बनलेल्या मल्लिकाने शरीरावर गुंडाळला तिरंगा, फुटले नव्या वादाला तोंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत आणि मुळचे राजस्थानचे असलेले दिग्दर्शक के. सी बोकाडिया अडचणीत सापडले आहेत. यावेळी हे दोघे आपल्या आगामी 'डर्टी पॉलिटिक्स' या सिनेमाच्या फस्ट लूकमुळे चर्चेत आले आहेत.
'डर्टी पॉलिटिक्स' या सिनेमाचा फस्ट लूक अलीकडेच रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये मल्लिका शेरावत शरीरावर तिरंगा गुंडाळून लाल दिवाच्या गाडीवर बसलेली दिसत आहे. तर तिच्यामागे अभिनेते ओमपुरी आणि आशुतोष राणा विक्ट्रीचे साइन देताना दिसत आहेत. पोस्टरमध्ये राजस्थान विधानसभा भवन आणि मल्लिकाच्या हातात एक सीडीसुद्धा दिसत आहे.
के. सी बोकाडिया यांच्यावर राजस्थानच्या एका राजकिय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिरंग्याऐवजी दुस-या फेब्रिकचा वापर करण्याचा दबाव टाकला आहे. सिनेमाचे पोस्टर उत्तेजक असल्याचे स्वतः बोकाडिया यांनी स्वीकार केले आहे. हा सिनेमा राजस्थानमधील चर्चित भंवरी देवी प्रकरणावर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या वादावर काय म्हणतात के. सी बोकाडिया...