आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Mamta Kulkarni And Her Husband Arrested On Charges Of Drug Trafficking In Kenya

अंमली पदार्थांच्या तस्करीत अटकेत असलेली महिला म्हणाली, 'मी ममता कुलकर्णी नाही'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी)

मुंबईः अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला अंमली पदार्थांच्या तस्करीत अटक करण्यात आलेल्या प्रकरणाला नवीन वळण आले आहे. अटकेत असलेल्या महिलेने मी ममता कुलकर्णी नसून केनिया वंशाची इव्हेंट मॅनेजर असल्याचे चौकशी करणा-या अधिका-यांना सांगितले आहे. महिलेने म्हटले, की मी ममता नसून केवळ तिच्या आणि माझ्य लूक्समध्ये साम्य आहे. सोबतच अटकेत असलेला मुख्य आरोपी विकी गोस्वामीविषयी काहीही सांगण्यास तिने नकार दिला आहे. चौकशी अधिका-यांनी या महिलेने नोंदवलेल्या जबाबावर शंका व्यक्त केली आहे. अधिका-यांनी विकी आणि त्याच्या पत्नीची ओळख पटवून देण्यासाठी भारतीय पोलिसांना अलर्ट पाठवले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, केनिया येथील मोमबासा येथून ममता कुलकर्णी हिला तिचा पती विजय गोस्वामी उर्फ विकीसह अटक केली. यांच्याव्यतिरिक्त पोलिसांनी आणखी तीन तस्करांना ताब्यात घेतले आहे. विकी आणि ममता यांच्याशिवाय अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये बख्ताश अकाशा या इसमाचा समावेश असून तो ब-याच वर्षांपासून अंमली पदार्थांची तस्करी करतोय. बख्ताश आंतरराष्ट्रीय ड्रग्स डीलर इब्राहिम अकाशाचा मुलगा आहे. अन्य तस्करांमध्ये बख्ताशचा भाऊ इब्राहिम आणि पाकिस्तानी वंशाचा गुलाम हुसैन यांचा समावेश आहे.
यापूर्वीही झाली होती विकीला अटक
ममता कुलकर्णीने 2012 मध्ये ड्रग्स तस्कर विकी गोस्वामीशी लग्न केले होते.1997 मध्ये विकी गोस्वामीला 60 लाख डॉलरच्या ड्रग्स तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती, त्याला दुबईत ही अटक झाली होती.

तुरुंगात स्वीकारला होता इस्लाम धर्म
विकी गोस्वामीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र तुरुंगातील त्याची चांगली वर्तणूक बघून त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती. दुबईतील तुरुंगात विकीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. त्यानंतर त्याने ममतासोबत लग्न केले.

विकी आणि ममता यांची ओळख खूप जुनी आहे. अशी चर्चा होती की, विकी तुरुंगात असताना त्याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय ममता सांभाळत होती. ममताने बॉलिवूडमध्ये शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.
पुढील स्लाईडमध्ये जाणून घ्या ममता कुलकर्णीच्या सिनेमांविषयी..