आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Bollywood Siren Mamta Kulkarni Arrested In Kenya

अभिनेत्री ममता कुलकर्णीला अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात केनियात अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः ममता कुलकर्णी)

मोमबासाः बॉलिवूडची एकेकाळची आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णीला केनियात अटक झाल्याचे वृत्त आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी केनियात मोमबासामध्ये तिला अटक झाली आहे. तिच्यासह तिचा पती विकी गोस्वामीलासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
यापूर्वीही झाली होेती विकीला अटक
ममता कुलकर्णीने 2012 मध्ये ड्रग्स तस्कर विकी गोस्वामीशी लग्न केले होते.1997 मध्ये विकी गोस्वामीला 60 लाख डॉलरच्या ड्रग्स तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली होती, त्याला दुबईत ही अटक झाली होती.
तुरुंगात स्वीकारला होता इस्लाम धर्म
विकी गोस्वामीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र तुरुंगातील त्याची चांगली वर्तणूक बघून त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती. दुबईतील तुरुंगात विकीने इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. त्यानंतर त्याने ममतासोबत लग्न केले.
विकी आणि ममता यांची ओळख खूप जुनी आहे. अशी चर्चा होती की, विकी तुरुंगात असताना त्याचा रिअल इस्टेटचा व्यवसाय ममता सांभाळत होती.
ममताने बॉलिवूडमध्ये शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या ममताविषयी बरेच काही...